महाराष्ट्र
सर्पमित्र संमेलन व वन्यजीव रक्षक सन्मान सोहळा राज्यस्तरीय आढावा बैठक 21 जुलैला हिंगोलीत

हिंगोली ; सापांच्या व वन्यजीवांच्या रक्षणासाठी प्राणी व सर्पमित्र हे संपूर्ण देशामध्ये काम करत आहेत. त्यांच्या कार्याला आर्थिक मनोबळ द्यावे एक संघटनात्मक बांधील की निर्माण करून न्याय हक्क आणि राष्ट्रीय राज्यपातळीवर मार्गदर्शन आणि सर्वांचे एकत्र येऊन नवी दिशा निर्माण करण्याचे कार्य संमेलनाच्या माध्यमातून व्हावे म्हणून हिंगोली जिल्ह्यामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्पमित्र संमेलन व वन्यजीव रक्षक सन्मान सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.
त्या निमित्ताने एक राज्यस्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात येत असून या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील सर्प व प्राणी मित्र यांनी आपले विचार नवीन संकल्पना कार्यक्रम नियोजन व जिल्हा समन्वयक नेमणूक पदभार व इतर महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्याचे आयोजन दिनांक 21 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता, स्थळ शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे उपस्थित राहून प्रस्थापित करावी.
राज्यस्तरीय मार्गदर्शन आढावा बैठकीला सर्पतज्ञ डॉ. संजय नाकाडे ,प्रा.संभाजी पाटील, सर्पतज्ञ देवदत्त शेळके,सर्पतज्ञ सागर वाबळे पाटील, डॉ. दिलीप मस्के, सर्पतज्ञ राहुल शिंदे, सर्पतज्ञ देवेंद्र भासले, सर्पतज्ञ जगदीश रेवतकर व यांच्यासह महाराष्ट्रातील प्राणी व सर्पमित्र हे उपस्थित राहणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक प्राणी व सर्पमित्र विजयराज पाटील,बाळू ढोके वाशिम जिल्हा सर्पमित्र प्रदीप पट्टेबहादूर, उमेश पाटील यांनी डॉ.संजय नाकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विजयराज पाटील मित्र मंडळ हिंगोली प्राणी व सर्व मित्र भीमाशंकर अण्णा गाढवे मित्र मंडळ लातूर, संपूर्ण महाराष्ट्रातील प्राणी व सर्पमित्र यांनी केले आहे.