महाराष्ट्रराजकारण

शिंदे यांनी केंद्रात जावे, हायकमांडने मुख्यमंत्र्यासाठी सुचवले हे नाव : आठवले

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड असे बहुमत मिळाले. तरी मुख्यमंत्री कोण? यावरून महायुतीमध्ये वाद सुरू आहे. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदावर असावेत, यासाठी शिवसेनेकडून दबाव टाकला जात आहे. तर शिंदेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न केंद्रातून केले जात आहेत. यादरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे महत्त्वाचे विधान समोर आले आहे. त्यांनी एकनाथ शिंदेंना दोन पावले मागे येऊन केंद्रात मंत्री होण्याचा सल्ला दिला आहे.

नेमकं काय म्हणाले आठवले?
देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्याचा मेसेज भाजपच्या हायकंमांडने एकनाथ शिंदेंना दिला आहे. पण त्यांच्यात थोडी नाराजी आहे. त्यांना पुन्हा एकदा संधा दिली जावी असं वाटतं आहे. बिहारचा फॉर्म्युला इथे लागू करण्याचा मुद्दा नाही. तिथले सूत्र वेगळे होते. तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नितीश कुमार यांना आधीच मुख्यमंत्रीपदाची मागणी केली होती. त्यांना आश्वासन दिलं होतं. परंतु येथे असे कोणतेही आश्वासन दिले गेले नाही. राज्यात झालेल्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यासर्वांचं योगदान आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली. मात्र, त्यामध्ये सर्वांचं योगदान होतं. शिंदे गटाच्या नेत्यांची मुख्यमंत्रापदाची मागणी योग्य असली तरी भाजप पक्ष त्यासाठी तयार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेत्यांनी भाजपने सांगितलेली गोष्ट मान्य केली पाहिजे. त्यांनी मंत्रीमंडळात आलं पाहिजे. त्यांना हवं तर त्यांनी केंद्रात आलं पाहिजे, त्यांनी मोदी आणि शाहांशी चर्चा करून कॅबीनेट मंत्रीपदी आलं पाहिजे, असंही रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button