नवी दिल्ली : दिल्ली मेट्रोतील विविध प्रकारचे व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. आता आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ दिल्ली मेट्रोमधील गोंधळाचा असल्याचे बोलले जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मेट्रोमध्ये मुलगी आणि मुलगा यांच्यात कडाक्याचे भांडण सुरु असल्याचे दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मेट्रोमध्ये हा गोंधळ झाला, त्यावेळी अनेक प्रवासीही मेट्रोच्या आत प्रवास करत होते. व्हायरल व्हिडीओमध्ये मुलगा आणि मुलगी यांच्यात वाद होत असल्याचे दिसत आहे. वाद सुरू असताना मुलगी सीटवर बसलेल्या मुलाला सांगते की तुझी बोलण्याची पद्धत बरोबर नव्हती.
यावर मुलगा म्हणतो की, तू पण नीट बोलली नाहीस. यानंतर अचानक मुलगी त्या मुलाला थप्पड मारते. यानंतर मुलगाही त्याच्या जागेवरून उभा राहतो आणि मुलीला त्याची कोपर दाखवतो. यावेळी मेट्रोने प्रवास करणारे इतर प्रवासी हा भांडण सोडवण्याचा प्रयत्न करू लागतात.
हा व्हिडिओ X वर ‘@gharkekalesh’ नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सतीश मिश्रा नावाच्या युजरने लिहिले की, ‘एका मुलीने एका मुलाला थप्पड मारली आहे. या मुलीसाठी कायदा नाही का? एखाद्या मुलाने हेच केले असते तर तो आतापर्यंत तुरुंगात गेला असता.
दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘भाऊ ही आता रोजची गोष्ट आहे. आता आम्ही याला कंटाळलो आहोत.’ दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘दिल्ली मेट्रो म्हणजे फक्त दुःख.’ कोणीतरी नेहमीच भांडत राहतो.
Kalesh inside Delhi Metro over seat issues (Girl slaps a guy inside Metro)
pic.twitter.com/7mHy9MJNmq— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 27, 2024