घर फोडून दोन लाखांचा ऐवज लंपास

प्रतिनिधी | बदनापूर
घरात कोणी नसल्याचे बघून अज्ञात चोरट्यानी भर दिवसा घराची कडी उघळून घरातील लोखंडी कपाट तोडून एक लाख 93 हजार रुपये किमतीचे सोने, चांदीचे वस्तू व नगद रक्कम पळविली असल्याची घटना 16 आगस्ट रोजी दुपारी 1 ते 3 वाजेच्या सुमारास वरुडी शिवारात घडली आहे.
बदनापूर तालुक्यातील वरुडी फाटा येथील गणेश विष्णु शिंदे वय 31 वर्ष व्यवसाय शेती यांनी बदनापूर पोलीस ठान्यात तक्रार दिली कि, माझी साडे पाच एकर शेती व घर वरुडी शिवारात शेत गट नं 81 व82 मध्ये आहे. सदर घरात मी माझी पत्नी लताबाई, दोन मुले,आई अनुसाबाई, वडिल विष्णु शिंदे असे राहतो.
16 आगस्ट रोजी दुपारी एक वाजेच्यासुमारास माझे आई-वडिल व पत्नी मोसंबीच्या शेतात शेतकामासाठी गेले, माझे दोन्ही मुले शाळेत गेले होते व मी तहसिल कार्यालय बदनापूर येथे शेतीच्याकामानिमित्त
घराचे फक्त कडी लावून कुलुप न लावता आलो होतो. माझे तहसिल मधील काम आवरुन परत घरी दुपारी 4 वाजता घरी आलो. तेव्हा माझे दोन्ही मुले व माझे वडिल घरी आले होते. वडिलांचे दुखत असल्याने त्यांना दाखवण्यासाठी धुत हाँस्पीटल ता.जि. छत्रपती संभाजीनगर येथे गेलो. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास माझी पत्नी व आई शेतातुन आले, तेव्हा माझी पत्नी हिने मला फोन करुन सांगितले की, आपल्याघरामधील लोखंडी कपाट व दुसऱ्या घरातील लोखंडी पेटी उघडे दिसत आहे. त्यात ठेवलेले सोन्याचे दाग-दागिणे, नगदी पैसे दिसुन येत
नाही व कपाटातील सामान अस्त व्यस्त दिसत आहे. कोणी तरी अज्ञात चोरट्याने सोन्याचे दाग-दागिणे, नगदी पैसे
चोरुन नेले आहे. तुम्ही तापडतोब या असे सांगितल्याने मी वडिलांना घेवुन परत संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घरी आलो. घरातील झालेला प्रकार मी पाहिला सदरची घटना साधारण दुपारी 02.00 ते 03.00 च्या दरम्यान घडली,त्याच वेळी आमचे घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरेचे बटन टिव्हीला जोडले असल्यामुळे ते बंद
केलेल होते.त्यामुळे त्यामध्ये घटनाक्रम आलेला नाही मी सदर घटनेबाबत आसपास माहिती घेवुन आज रोजी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आलो आहे.
माझ्या घरातून 80,000/- रू किंमतीचे प्रत्येकी 10 ग्राम 40,000 रु प्रमाणे दोन सोन्याचे एकदानी,38,000/- रू किंमतीचे 10 ग्राम सोन्याची पोत, 37,000/- रू किंमतीचे कानातील 10 ग्राम सोन्याचे छुमके व वेल,7,000/- रू किंमतीचे प्रत्येकी 01 ग्राम सोन्याची नाकातील 2नथ, 17,000/- रू किंमतीचे 05 ग्राम कानातील सोन्याची बाळी, 9,000/- रू किंमतीचे 20 बार चाँदीचे कड, पायातील चैन,5,000/- रू किंमतीचे नगदी रोख ज्यात 100 रु,200 रु चलनी नोटा असा एकूण एक लाख 93 हजाराचा येवज चोरीस गेला.
सदर तक्रारीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात 17 आगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.