देश-विदेश

कॉमिक्स संग्रहासाठी २० वर्षीय मुलांने आईला खेचले कोर्टात

चियाई : आईने मुलाचे कॉमिक्स संग्रह कचर्यात फेकले, त्यामुळे त्या वीस वर्षीय तरुणाला इतका राग आला की त्याने स्वत:च्या सख्या आईला कोर्टात खेचले. तसेच आईबरोबर समेट करण्यासही नकार दिला. ही घटना तैवान येथील आहे.

हे विचित्र प्रकरण तैवानच्या चियाई शहराचे आहे, जिथे 64 वर्षीय महिलेने आपल्या मुलाचे ‘अटॅक ऑन टायटन’ कॉमिक्स कलेक्शन कचर्यात फेकून दिले. आपल्या मुलाच्या कॉमिक्सच्या वेडामुळे ती महिला कंटाळली होती. तसेच ओलाव्यामुळे कॉमिक्स सडत असल्याचे पाहून तिने आवश्यक जागा तयार करण्यासाठी ती कचर्यात फेकून दिली. याबद्दल तरुणाला माहिती पडताचा त्याचा संताप वाढला. त्याने मागचा पुढचा विचार न करता तात्काळ पोलिसांना बोलावले.

मग त्याने आपल्या वृद्ध आईविरुद्ध तक्रार दाखल केली आणि तिला कोर्टात खेचले आणि तिच्यावर त्याला न विचारता त्याची वैयक्तिक मालमत्ता नष्ट केल्याचा आरोप केला. या तरुणाने न्यायालयात युक्तिवाद केला की, ‘अटॅक ऑन टायटन’ हे एक अतिशय लोकप्रिय कॉमिक आहे आणि त्याचा संपूर्ण संग्रह मिळणे कठीण आहे. तो म्हणाला की त्याच्या 32 आवृत्त्यांपैकी काही आवृत्त्या यापुढे मुद्रित नसल्यामुळे, ती एक मौल्यवान संग्राहक वस्तू मानली जाऊ शकते.

त्याच वेळी, तरुणाच्या आईने असा युक्तिवाद केला की कॉमिक्स ओलसर झाले होते आणि घरात भरपूर जागा घेत होते, म्हणून जागा बनवण्यासाठी त्यांना फेकून देणे चांगले वाटले. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, महिलेने कोर्टात आपल्या मुलाशी समेट घडवून आणण्याचा प्रयत्नही केला होता, पण तो तरुण राजी झाला नाही.

ही धक्कादायक घटना यावर्षी फेब्रुवारी महिन्यात घडली होती. हा निकाल देताना न्यायालयाने महिलेला नुकसान भरून काढण्यासाठी 5 हजार तैवानी डॉलर्स (म्हणजे 13 हजार दोनशे रुपयांहून अधिक) दंड ठोठावला. तसेच मुलाच्या मालमत्तेच्या अधिकारांचा आदर न करणे अयोग्य असल्याचे म्हटले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button