क्राइमभारत

3 मुलांची आई पडली तरुणाच्या एकतर्फी प्रेमात, तरुणाचे लग्न ठरताच केला ॲसिड हल्ला

आग्रा : आग्रा येथे एका महिलेने एकतर्फी प्रेमातून तरुणावर ॲसिड हल्ला केला व त्यानंतर या निर्दयी महिलेने स्वत:वरच अ‌ॅसिड हल्ला झाल्याचा बनाव करत पोलिसांना घटनेची माहिती दिली. ही घटना सोमवारी दुपारी ३ वाजता घडली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला आणि आरोपी महिलेला अटक करून तिची कारागृहात रवानगी केली.

हेमशंकर असे ॲसिड हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून तो आवास विकास कॉलनीत राहतो. हेमशंकर याचे खंडारी परिसरात दुकान आहे. सुमारे ६ महिन्यांपूर्वी ॲसिड हल्ल्याची आरोपी महिला अस्मा हेमशंकररच्या दुकानात सामान घेण्यासाठी आली होती. दुकानात सामान घेतल्यानंतर अस्मा आणि हेमशंकर हे एकमेकाच्या संपर्कात आले.

दोघेही एकमेकांशी बोलू लागले. अस्मा तीन मुलांची आई आहे. अस्मा हेमशंकरवर मनापासून प्रेम करू लागली. नुकतेच हेमशंकरचे लग्न ठरले. त्यानी अस्माला याबाबत माहिती दिली. लग्न ठरल्याची माहिती मिळताच अस्माने हेमशंकर लग्न करू नकोस हे लग्न मोड, असे सांगितले.

सुरुवातीला हेमशंकरने अस्माच्या बोलण्याला हलक्यात घेतले. मात्र त्यानंतर ती पुन्हा-पुन्हा हेमशंकरवर लग्न मोडण्यासाठी दबाव टाकू लागली. आता हेमशंकरला समजले होते की हे प्रकरण विनोदी नसून गंभीर आहे. तू तीन मुलांची आई आहेस, असेही हेमशंकरने अस्माला सांगितले. हेमशंकरने लग्न मोडण्यास स्पष्ट नकार दिला.

यानंतर अस्माने ॲसिड आणून हेमशंकरच्या चेहऱ्यावर फेकले. ॲसिड हल्ल्यामुळे हेमशंकरच्या चेहऱ्यावर अनेक ठिकाणी खोल जखमा झाल्या होत्या. तसेच ॲसिड डाव्या खांद्यावर पडले. ॲसिड इतके असरदार होते की त्यामुळे हेमशंकरची त्वचा अनेक ठिकाणी भाजली.

जखमी हेमशंकरवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अस्मा इतकी चालाख निघाली की, तिने हेमशंकरवर ॲसिड फेकल्यानंतर हेल्पलाइन क्रमांक 112 वर कॉल करून आपल्यावर कोणीतरी ॲसिड फेकल्याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत अस्मा घटनास्थळावरून पळून गेली होती. पोलिसांनी तिचा फोन नंबर घेतला आणि सर्विलांसवर ठेवला. पोलिसांना सर्विलांसवरुन अस्माचे लोकेशन कळले आणि पोलिसांनी तिला अटक केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button