क्राइम
मलकापूर पांग्रा येथे महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पांग्रा येथे सुनिता सदानंद उबाळे वय ४० वर्ष ही महिला २३ आगस्ट रोजी शेतातील विहिरीवर पाणी आणण्याकरता गेली होती. सदर महिलेचा तोल जाऊन विहिरीत पडली व विहिरीत पाणी असल्यामुळे पाण्यात बुडून महिलेचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल निवृत्ती पोफळे यांनी घटनेचा पंचनामा केला याप्रकरणी साखरखेर्डा पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद केल्याची माहिती २४ आगस्ट रोजी दुपारी ४ वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.