इतरदेश-विदेशभारत

काय आहे लखपती दीदी योजना

मुंबई : सध्या महाराष्ट्रासह देशभरात लखपती दीदी योजनेची चर्चा आहे. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगावात लखपती दीदी योजनेचा कार्यक्रम पार पडला. पण ही लखपती दीदी योजना नेमकी आहे तरी काय? यासाठी कोण अर्ज करु शकतं? कुठे अर्ज पाठवायचा? काय फायदा मिळतो? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांना बिनव्याजी पाच लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देणे हे लखपती दीदी या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. यामुळे महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास आणि वाढविण्यास सक्षम होणार आहेत. देशभरात तीन कोटी ‘लखपती दीदी’ निर्माण करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे.तुम्हाला लखपती दीदी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही गोष्टी माहिती असायला हव्यात.

देशातील महिलांच्या सबलीकरणासाठी ही विशेष योजना आणण्यात आली आहे. १८ ते ५० वयोगटातील महिला लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करु शकतात.

घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरदार नसलेली महिला, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी असलेली महिला यासाठी अर्ज करु शकते.

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आणि त्याचा लाभ मिळवण्यासाठी महिलांना ‘सेल्फ हेल्प ग्रुप’ व्यवसाय योजना तयार करावी लागेल. व्यवसाय आराखडा तयार झाल्यानंतर, बचत गट योजना आणि अर्ज सरकारकडे पाठवेल. सरकारकडून अर्जाची छाननी आणि पुनरावलोकन केले जाईल.

अर्ज स्वीकारला गेल्यास तुम्हाला कळवण्यात येईल. यानंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेअंतर्गत अनेक राज्यांमध्ये पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते.

या योजनेत सहभागी होण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बॅंक पासबुक, पासपोर्ट साइज फोटो,मोबाईल नंबर हे दस्तावेज असणे आवश्यक आहे.

उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे. महिलांना स्वत:चा उद्योग उभा करण्यासाठी एक लाख रुपयांपासून ते पाच लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज मिळेल. एकूण तीन कोटी महिलांना या योजनेच्या माध्यमातून जोडण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button