क्राइममहाराष्ट्र

बोपदेव घाट आरोपी ताब्यात : ६० पथके, ५० हजार मोबाईल डाटाचा संकलित, ७० ते ८० किलोमीटरपर्यंतचे सीसीटीव्हीची तपासणी

पुणे : बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणात अखेर पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले. गुन्हे शाखेने दोन संशयितांना नागपूर मधून ताब्यात घेतले तसेच बोपदेव घाटाच्या पायथ्याशी असलेल्या कोंढव्यातील येवलेवाडी परिसरातून एकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. अद्याप त्यांना अटक करण्यात आली नाही. त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.

आरोपीला ताब्यात घेण्यासाठी ६० पथके तयार करण्यात आली होती, तर त्या मार्गावरून गेलेल्या ५० हजार मोबाईल डाटा संकलित करण्यात आला होता तसेच ७० ते ८० किलोमीटरपर्यंतचे सीसीटीव्हीची तपासणी करण्यात आली होती. आरोपीची माहिती देणाऱ्यास १० लाखाचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, बोपदेव घाटामध्ये २१ वर्षीय तरूणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील एका संशयित आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर इतर दोन आरोपींना नागपुरातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. ताब्यात घेतलेल्यांची सखोल चौकशी सुरु आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली आहे.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांच्या ६० टीम पोलिसांनी तयार केल्या होत्या. मात्र घटनेच्या ९ दिवसानंतरही आरोपी मोकाट असल्याने पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. त्यामुळे सगळीकडून या घटनेचा आणि पोलिसांच्या तपासावर संताप व्यक्त केला जात होता. आरोपींचे स्केच तयार केले आहेत. शिवाय आरोपीची माहिती देणाऱ्याला १० लाखाचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. आतापर्यंत रेकॉर्डवरील ४०० गुन्हेगारांची झाडझडती घेण्यात आली आहे.

बोपदेव घाट परिसरात गुरुवारी (३ ऑक्टोबर) रात्री मित्राबरोबर फिरायला आलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. पसार झालेल्या आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी ६० पथके तयार केली आहेत. गेल्या पंधरा दिवसांत बोपदेव घाटमार्गे गेलेल्या ५० हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती संकलित करण्यात आली असून, या माहितीचे तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे. बोपदेव घाटातील मोबाइल संपर्क यंत्रणा क्षीण असल्याने तांत्रिक तपासात अडथळे आले आहेत. आरोपी सासवडमार्गे पसार झाल्याची शक्यता आहे. घटनास्थळापासून ७० ते ८० किलोमीटरपर्यंतचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांकडून तपासण्यात आले.

पुणे शहरातील प्रमुख टेकड्या, घाट परिसरात विनयभंग, बलात्कार, दरोडा असे गंभीर गुन्हे केलेल्या आरोपींची चौकशी सुरू करण्यात आली आहे. बोपदेव घाट परिसरातील ४० गावांमध्ये जाऊन पोलिसांनी पाहणी केली. त्या गावातील ढाबे, दारूविक्रेते, बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांकडे चौकशी करून माहिती घेण्यात आली आहे. पोलिसांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक हॉटेलवरील सीसीटीव्ही तपासले. चित्रीकरणात संपूर्ण परिसर दिसत नसल्याने अडचणी आल्या आहेत. ग्रामीण पोलिसांच्या सासवड, राजगड पोलीस ठाण्यातील तपास पथकांची मदत घेण्यात आली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button