महाराष्ट्रराजकारण

लाडकी बहिण योजना म्हणजे भिकारी जीवन जगण्याची सवय लावणारी योजना, सरकारला नोटीस

मुंबई : लाडकी बहिण याेजना ही शिंदे सरकारची मास्टर स्ट्रोक योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दिड हजार रुपये मिळत आहे. मात्र लोकप्रियबरोबरच या योजनेवर टिका होत आहे. महायुती सरकारने लागू केलेल्या लाडकी बहीण योजनेला चांगल प्रतिसाद मिळत आहे. लाखो महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. तीन महिन्याचे मानधन ४५०० रुपये तसेच ३००० रुपये दिवाळी बोनस असे ७५०० रुपये रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. विरोधकाकंडून सरकारच्या लाडकी बहिण योजनेवर टीका केली जात आहे. अशातच आता सरकारच्या लाडकी बहीण योजनेला कायदेशीर नोटीस बजावली आहे.

महायुती सरकारची ‘लाडकी बहीण योजना’ ही कायमस्वरूपी रोजगार मिळवून न देता भिकारी जीवन जगण्याची सवय लावणारी योजना आहे. असा आरोप करत राजकीय विश्लेषक विनय हर्डीकर आणि असीम सरोदे यांनी सरकारला नोटीस पाठवलीये. ‘ही योजना राजकीयदृष्ट्या प्रेरित असून, केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लागू केलीये’ असाही नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. या कायदेशीर नोटीसची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्थमंत्री अजित पवार, मुख्य सचिव तसेच महिला व बाल विकास मंत्रालय यांना पाठवण्यात आली आहे. लाडकी बहिण योजनेबद्दल खोटी माहिती पसरवणं ठाकरे गटाचे नेता संजय राऊतांना भोवलं आहे.

संजय राऊत यांच्याविरोधात मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. खोटी अफवा पसरवल्याबद्दल संजय राऊत यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. मध्य प्रदेशातील लाडकी बहिण योजना बंद पडल्याचा खोटा दावा राऊतांनी केला होता. भोपाळमध्ये भाजप महिला मोर्चाच्या तक्रारीनंतर संजय राऊत विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरेंची राज्य सरकारवर जोरदार टीका
लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलीये…लाडका भाऊ कोणाला म्हणायचं हेच बहिणीला कळत नाही…प्रत्येकजण म्हणतो मीच तुझा भाऊ…हे सगळे फुकट खाऊ…पैसा जनतेचा…जनतेच्या पैशावर फुकट खाऊ म्हणतात मीच तुझा भाऊ…अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर टीका केलीये…

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button