इतरमहाराष्ट्र
सोशल मिडीयावर पोस्ट करताना ‘सावधान’
धार्मिक तेढ निर्माण करणा-याविरुद्ध थेट गुन्हे दाखल होणार ; पोलीस अधीक्षकांच्या सक्त सुचना

छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण पोलीस दलाचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी सोशल मिडीयाचे माध्यमांतुन धार्मिक व जातीय भावना दुखावुन दोन समाजात तेढ निर्माण होतील असे स्टेटस, व्हिडीओ क्लिप्स, आक्षेपार्ह मजकुर, एसएमएस, तयार करून प्रसारित करण्याऱ्यावर थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. कोणीही सामाजिक सलोखा खराब करून अशांतता होईल असे वातावरण निर्माण करणा-या व्यक्तींविरुध्द बी.एन.एस. 2023 चे कलम 196, 299, कायद्यानुसार तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाईला सामोर जावे लागणार आहे. सामाजिक सौहार्द बिघडविण्या-या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नसल्याचा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.
पोलीस अधीक्षक राठोड यांनी नागरिकांना आवाहन केले आहे कि, सोशल मिडीयाच्या माध्यमांतून पसरविण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टची सर्व प्रथम खात्री करणे अत्यावश्यक आहे. जुने विवादीत बाबीचा काही असामाजिक तत्व हे फायदा घेवुन सोशल मिडीयाचे माध्यमांतून निराधार व खोटी अफवा पसरवुन जाती- जातीत तसेच दोन धर्मात तेढ निर्माण करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजकंटकाद्वारे विविध मार्गाचा अवलंब करण्यात येवुन सामाजिक सलोखा बिघडवण्याचे दृष्टीने सामाजिक व भावनिक गोष्टीला साद घालुन निष्पाप तरूणाईचे डोक्यात इतराबाबत द्वेष निर्माण करण्यात येतो.
पोलीस सर्व परिस्थीतीला हाताळण्यास सक्षम असून सायबर पोलीस टिम तंत्रज्ञान व विशेष टुलच्या साहय्याने सर्व प्रकारच्या सोशल मिडीया साईटवर बारकाईने लक्ष ठेवुन आहेत. पोलीसांची सोशल मिडीया पेट्रालिंग नियमत सुरु असते.
पालकांनी आपल्या मुलांवर अधिक लक्ष ठेवावे जेणे करून त्यांच्याकडुन प्रक्षोभक किंवा समाजमन दुखावले जातील अशा आशयाचे मत कोणत्याही सोशल माध्यमांतुन दिले जाणार नाही यांची दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तीमध्ये बहुतांश प्रमाणात 19 ते 30 वयोगटातील तरुण मुलांचा समावेश असतो. त्यामुळे गुन्हे दाखल झाल्यानंतर अशा मुलांना त्यांचे कृतीचा नंतर पश्चाताप होतो परंतु तो पर्यंत वेळ निघुन गेलली असते. त्यामुळे सोशल मिडीयाचा जबाबदारीने वापर करून तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्या पोस्ट बनवु नये अगर फॉरवर्ड करू नये, तसेच कोणत्याही पोस्ट ला प्रतिक्रिया देतांना संयम बाळगावा ,अपशब्दांचा वापर झाल्यास हा सुध्दा अपराध आहे, कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रध्दांचा अपमान करून धार्मिक भावना दुखावण्याचे उद्देशाने धार्मिक श्रध्दांचा अपमान करणा-या व्यक्तीला ३ वर्षापर्यंत कारावास व दंड अशी शिक्षा होऊ शकते.