क्राइमक्राइम स्टोरीमहाराष्ट्र
नाशिकमध्ये भररस्त्यात विकृत तरुणांकडून गायीवर अत्याचार
नाशिक : नाशिकमध्ये भररस्त्यात विकृत तरुणांकडून गायीवर अत्याचार करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. २६ वर्षीय तरुणाने चक्क एका मूक जनावरावर अत्याचार केल्याचं व्हिडीओ समोर आला आहे. विकृत तरुणाचा व्हिडीओ व्हायरल व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.
ही घटना नाशिक जिल्ह्यातील सातपूर परिसरात घडली आहे. एका २६ वर्षीय तरुणाने एका गायीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संशयित विकृत तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना उजेडात आली.
संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चक्रधर नारायण ठाकरे असे वय २६ वर्ष असलेल्या आरोपीचे नाव आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आल्यानंतर परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. चिडलेल्या नागरिकांनी संशयित आरोपीला चोप देत दिले पोलिसांच्या ताब्यात दिले.