‘क्विक हिल फाउंडेशन’ तर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे
धाराशिव (प्रतिनिधी)
तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथील कै.अंबुमाता कनिष्ठ महाविद्यालयात (दि.१३ सप्टेंबर) रोजी शिव छत्रपती शिक्षण संस्था, लातूर संचलित राजर्षी शाहू महाविद्यालय (स्वायत्त) आणि क्विक हिल फाउंडेशन पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या ‘सायबर सुरक्षेसाठी सायबर शिक्षा’ या उपक्रमांतर्गत राजर्षी शाहू महाविद्यालयातील विद्यार्थिनी वाघमारे क्रांती सदाशिव यांनी सायबर सुरक्षा या विषयावर इयत्ता अकरावी व बारावी या वर्गातील कला आणि विज्ञान या दोन शाखेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये स्मार्टफोन वापरण्याचे प्रमाण हे जास्त असते. त्या मुळे त्यांना सायबर गुन्ह्यांची आणि त्यापासून होणाऱ्या बचावासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात या संबंधी माहिती होण्यासाठी ‘सायबर सुरक्षेसाठी सायबर शिक्षा’ या उपक्रमांतर्गत सायबर सुरक्षेचे धडे देण्यात आले. हा क्विक हील फाऊंडेशन यांचा एक अतिशय चांगला उपक्रम आहे. ज्यात सायबर सुरक्षा शिक्षणाच्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. ज्यात विद्यार्थ्यांना डिजिटल लँडस्केपमध्ये स्वतःचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ज्ञानाने सक्षम बनवणे आणि दुसरे म्हणजे, संपूर्ण समाजात सायबर सुरक्षा जागरूकता पसरवणे.
तसेच डिजिटल सुरक्षेशी संबंधित जोखीम, धोके आणि सर्वोत्तम पद्धतींबद्दल विद्यार्थी, शाळा, महाविद्यालय आणि संस्थांना शिक्षित करून भारतातील सायबर गुन्हे रोखण्यासाठी सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. आजची पिढी हि सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहे. त्या मध्ये घडणारे गुन्हे हे विद्यार्थ्यांना समजावे आणि त्यातून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी दक्ष रहावे हा हेतू समोर ठेवून ह्या कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक फयाज पटेल आणि किरण लोमटे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. शेवटी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, समस्या आणि उपाय या वरील पीडीएफ पुस्तिका डाउनलोड करण्यास सांगितले. विद्यार्थ्यांना पुस्तिका डाउनलोड करण्यासाठी प्रोत्साहित करण्यास आणि सोशल मीडिया अकाउंट आणि चॅनेलद्वारे या उपक्रमाचे व्यवस्थापन आणि प्रचार करण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले.