क्राइममनोरंजनमहाराष्ट्र

‘दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना अडकवण्याचा फडणवीसांचा होता प्लॅन’

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा खळबळजनक दावा

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबरच शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंना अडकवण्याचा फडणवीस यांचा प्लॅन होता, असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे. दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचे संबंध असल्याचे प्रतिज्ञापत्र फडणवीस यांनी माझ्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवले होते. मी त्यावर स्वाक्षरी केली असती तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तुरुंगात असते असा खळबळजनक दावा अनिल देशमुखांनी केला आहे. एवढेच नव्हे तर अन्य राजकीय नेत्यांच्या मुलांनाही अडकवण्याचा फडणवीस यांचा कट होता, असे देशमुख म्हणाले.

अनिल देशमुख यांना पत्रकार परिषद घेत फडणवीसांवर आरोप केले आहेत. पत्रकार परिषदेत काही फोटो दाखवत देशमुख यांनी समित कदम नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करत फडणवीसांवर आरोप केले. अनिल देशमुख म्हणाले, तीन वर्षांपूर्वी फडणवीसांनी समित कदम नावाच्या व्यक्तीला माझ्याकडे पाठवले होते. समित कदम माझ्याकडे प्रतिज्ञापत्र घेऊन आले होते. समित कदम आणि फडणवीस यांचे जवळचे संबंध आहेत. नगरसेवक नसलेल्या या माणसाला फडणवीस यांनी वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे, असे म्हणत देशमुखांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

गृहमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करताना देशमुख म्हणाले की, राजकीय नेत्यांच्या मुलाला अडकवण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न होता. मी समित यांनी आणलेल्या प्रतिज्ञापत्रावर तेव्हा सही केली असती तर उद्धव ठाकरे जेलमध्ये असते. फडणवीसांचा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि पार्थ पवार यांना अडकवण्याचा डाव होता. मी प्रतिज्ञापत्रावर सही केली असती तर आज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे जेलमध्ये असते. आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालीयन प्रकरणासंदर्भातले आरोप होते. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी 300 कोटी रुपये वसुली करण्यास सांगितले असल्याचा देखील आरोप त्यात होता, असा खळबळजनक आरोप देशमुखांनी केला आहे.

देशमुख यांनी एवढ्यावरच न थांबता सांगितले की, हाच डाव फडणवीसांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांविरुद्ध वापरल्याचा दावा केला आहे. हा डाव फसला म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात देखील असाच डाव वापरला. तो यशस्वी झाला. अजित पवारांविरोधात देखील असाच डाव वापरला तो सुद्धा यशस्वी झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button