फिल्मस्टाईल पोलिसाने खिशात टाकली पुडी; PSI सह तीन पोलिस निलंबित

मुंबईतील वाकोला परिसरात पोलिसांनी एका इसमाची झडती घेऊन त्याच्या खिशात पुडी टाकली. नंतर त्याला अनाधिकृतरित्या ताब्यात घेतले. हा प्रकार खार पोलिस ठाण्यांतर्गत घडला आहे. याप्रकरणी पीएसआयसह तीन पोलिसांना निलंबित केले आहे.
MUMBAI | Four police officers, including a sub-inspector, have been suspended in Khar following allegations of planting drugs on a man, Daniel, during a raid. Deputy Commissioner of Police (Zone XI) Rajtilak Roshan confirmed the suspension after CCTV footage seemingly captured… pic.twitter.com/lb8j3MpkxI
— ℝ𝕒𝕛 𝕄𝕒𝕛𝕚 (@Rajmajiofficial) August 31, 2024
झाडाझडतीच्या नावाखाली एका सामान्य नागरिकाच्या खिशात पोलिसांनीच वस्तू टाकली. परंतु हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. या प्रकरणी खार पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस कॉन्स्टेबल निलंबित झाले आहेत. वाकोला परिसरात कारवाई करत एका इसमाची अनधिकृतपणे झडती घेऊन त्याला ताब्यात घेणं पोलिसांना महागात पडलं आहे.
अंगझडतीच्या नावाखाली स्वतःच्या खिशातील वस्तू इसमाच्या खिशात टाकताना पोलीस सीसीटीव्हीत कैद झाले होते. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच परिमंडळ नऊच्या पोलीस उपायुक्तांनी ही कारवाई केली.