महाराष्ट्र

विनापरवानगी उडणाऱ्या ड्रोनवर आता ग्रामीण पोलिसांचे नियंत्रण

मराठवाड्यात प्रथमच अँटी ड्रोन यंत्रणा - पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड

छत्रपती संभाजीनगर : सध्या अनेकजण विना परवानगी बिनधास्तपणे ड्रोन उडवीत असल्याचे दिसून येते. याचा गुन्हेगारीवृत्तीचे लोक देखील वापर करतात. त्यामुळे आता ग्रामीण पोलिसांनी अँटी ड्रोन यंत्रणा पोलीस दलात कार्यान्वित केली आहे. इस्त्राइल देशाची ही यंत्रणा असून त्याद्वारे उडत्या ड्रोनवर नियंत्रण मिळवणे पोलिसांना शक्‍य होणार आहे. मराठवाड्यात पहिल्यांदाच ही यंत्रणा आल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड यांनी दिली. शुक्रवारी ३० ऑगस्टला ग्रामीण पोलिस मैदानावर याची चाचणी घेण्यात आली. तसेच सर्दीलेन्स ड्रोन कॅमेरेही ताफ्यात दाखल झाली आहेत.

सण उत्सव तसेच मिरवणुका व कायद्या व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने त्यांचेवर करडी नजर ठेवण्यासाठी तसेच जमावाची किंवा कोणत्याही घटनेची अचुक परिस्थीती माहिती होण्यासाठी जिल्हा पोलीस दल आता अत्याधुनिक ३६० डिग्री ऑबस्टॅक्लस सेन्सर्स असेले ड्रोन कॅमेऱ्याची बळकटी मिळाली आहे. तसेच जिल्हयात जागतिक वारसा स्थळे असल्याकारणाने अशा ठिकाणी अनाधिकृत पणे ड्रोन उडत असल्यास असे ड्रोनला आता जिल्हा पोलीस दल हे अँटी ड्रोन गन ने प्रतिबंध घालणार आहेत.
जिल्हा पोलीस दलातील अत्याधुनिक सर्दीलेन्स ड्रोन हे आधुनिक तंत्रज्ञानानी सुज्ज असुन यामध्ये ३ लेन्स असुन पहिली लेन्स ही टेली फोटो लेन्स २० मेगापिक्सलची असुन याद्वारे स्पष्ट फोटो इमेज घेता येईल तर ४ के रिझोलेशेन असेलेले व्हिडीओ लेन्स, तसेच सर्वात महत्वाचा ६४० मेगा पिक्सल धरमल लेन्स यामध्ये उपलब्ध आहे या थरमल लेन्सच्या माध्यमांतुन अंधारातमध्ये किंवा झाडाच्या किंवा कोणत्याही मोठ्या वस्तुच्या आडोशाला असलेली व्यक्ती अथवा वस्तु जी सहज डोळयाला दिसणार नाही त्यांची अंधारात सुध्दा थरमल इमेज द्वारे फोटो घेण्यास मदत होणार आहे.
याचप्रमाणे यामध्ये इंटिग्रेटेट स्पिकर्स सिस्टम असल्याने व्हाईस कमांड किंवा रेकॉर्ड केलेले संदेशाद्वारे कंट्रोल पॅनलवरून ५ कि.मी. पर्यत नागरिकांना सुचना किंवा संदेश देणे शक्य आहे. ज्यामुळे पोलीस नागरिकांनी संवाद साधु त्यांना मार्गदर्शन करून शकतील. तसेच सर्धीलेन्स ड्रोन ची आकाशामध्ये अधिकत उंची ही ६ कि.मी. पर्यत असुन तो ३ ते ६ किमी दरम्यान आकाशात स्थिर होवु शकतो तर १५ किमी लांब पर्यंत जावुन फोटो, व्हिडोओ रेकार्ड करु करण्याची त्यांची क्षमता आहे. तसेच ड्रोनच्या ३ मिटर क्षेत्रात कोणताही मोठा अडथळा आल्यास ड्रोनमध्ये ३६० डिग्री ऑबस्टॅक्लस सेन्सर्स असल्याने हा जागीच स्थिरावतो व त्यापुढे तो जात नाही ज्यामुळे कोणतीही ईजा होणे शक्य नाही.

ऐतिहासिक स्थळांच्या सुरक्षेसाठी तैनात
जिल्हयात जागतिक वारसास्थळे असल्यामुळे अशा ठिकाणाची सुरक्षा अत्यंत महत्वाची असते. याठिकाणाची माहिती घेण्यासाठी या परिसरात अनाधिकृतपणे ड्रोन चा वापर केला जात असल्यास असे ड्रोनला प्रतिबंध करण्यासाठी अँटी ड्रोन गन चा वापर करणे शक्य आहे. या गनमध्ये असलेल्या विविध फ्रिक्वन्सीच्या आधारे अनाधिकृतपणे उडणा-या ड्रोनचा त्याच्या कंट्रोल पॅनलशी संपर्क तोडणे शक्य झाले आहे. तसेच परिस्थितीनुसार त्या ड्रोनला खाली उतरविणे किंवा परत पाठविणे शक्य झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button