त्या दिवसाचा व्हिडिओ समोर, लोखंडी पाईपाला खिळे गुंडाळून सरपंचाची हत्या
बीड : बीड येथील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोन आरोपींना पुण्यातून पोलिसांनी अटक केली. सुदर्शन घुले (वय २६) आणि सुधीर सांगळे (वय २३) असे अटक करण्यात आरोपींची नावे आहेत. एका डॅाक्टरच्या चौकशीतून आरोपींची माहिती मिळाली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात या डॅाक्टरलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींना न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून आरोपींकडून करण्यात आलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
९ डिसेंबर रोजी मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण आणि त्यानंतर अत्यंत अमानुषपणे त्यांची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे महाराष्ट्रातून तीव्र स्वरुपाची लाट उसळून आली होती. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात एकूण सात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींंच्या चौकशीत पोलिसांनी महत्वाचे पुरावे उघड केले आहेत.
या हत्येमध्ये ३.५ फूट लांब गॅस सिलिंडर पाईप, लोखंडी खिळ्यांनी गुंडाळलेला पाईप, लाकडी दांडक्यांचा वापर करण्यात आला होता. मोबाईलमधील व्हिडिओ क्लिप्समध्ये मारहाण करतानाचा संपूर्ण प्रकार आहे. या व्हिडिओत देशमुख यांना मारहाण करण्यात असल्याचे दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच डॅाक्टरांनी देखील त्यांच्या शरीरावर ५६ जखमा आणि फोड असल्याचे शवविच्छेदन अहवाल देत नमूद केले आहे.
आरोपींचा गुन्हेगारी इतिहास
पोलिसांनी या प्रकरणात वेगाने तपास करीत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. सीआयडीच्या तपासमुळे या हत्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. आरोपींच्या विरोधात पुरावे असल्याने वेगवान गतीने हा तपास पुढे नेण्यात आला आहे. आरोपींचा गुन्हेगारी इतिहास आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्याविरोधात हत्या, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, दंगल आदी १० गुन्हे दाखल आहेत. आरोपींना कठोर शिक्षेची मागणी देशमुख कुटुंबाकडून करण्यात येत आहे.