क्राइममहाराष्ट्र

लॉरेन्स बिष्णोईची हत्या करा अन् मिळवा 1,11,11,111 रुपये

मुंबई : बाबा सिद्दीकी, मुसेवाला तसेच करणी सेनेचे अध्यक्ष अध्यक्ष गाेगामेदी यांची हत्याची जबाबदारी बिष्णोई गँगनं घेतली. तसेच अभिनेता सलमान खान याला धमकी देण्याचं सत्रही या गँगनं सुरूच ठेवलं. इथं लॉरेन्स बिष्णोई गँग दर दिवसागणिक एका नव्या कारणामुळं चर्चेत असतानाच आता या गँगविरोधात क्षत्रीय करणी सेनेनं टोकाचं पाऊल उचललं आहे.

गुजरातच्या तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिष्णोई याला ठार मारणाऱ्यांसाठी करणी सेनेकडून कोट्यवधींचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. क्षत्रीय करणी सेनेचे अध्यक्ष राज शेखावत यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून बिष्णोईला संपवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना ना 1,11,11,111 चं बक्षीस दिलं जाणार असल्याचं जाहीर केल्याचं वृत्त एका प्रतिष्ठीत माध्यमसमूहानं प्रसिद्ध केलं. ‘आमच्यासाठी एखाद्या रत्नाप्रमाणं असणाऱ्या अमर शहीद सुखदेव सिंह गोगामेद जी यांचा मारेकरी’ असा उल्लेख करत करणी सेनेनं बिष्णोईविरोधातील रोषभावना व्यक्त केली.

सुखदेव सिंह गोगामेदी जी हे करणी सेनेचे अध्यक्ष होते. 5 डिसेंबर 2023 रोजी जयपूरमध्ये त्यांच्यावर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला होता. त्यांच्या हत्येच्या काही तासांनंतरच बिष्णोई गँगकडून या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली होती. दरम्यान, क्षत्रीय करणी सेनेच्या सांगण्यानुसार संरक्षण दलाच्या सेवेत असणाऱ्या कोणालाही हे बक्षीस दिलं जाणार आहे. हे बक्षीस जाहीर करत असताना करणी सेनेच्या अध्यक्षांनी केंद्र सरकार आणि गुजरात सरकारलाही धारेवर धरलं.

उपलब्ध माहितीनुसार लॉरेन्स बिष्णोई गुजरातच्या साबरमती कारागृहात असून, अमली पदार्थांच्या तस्करीवरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार करण्याचा आरोपही बिष्णोईवर असला तरीही त्याचा ताबा मात्र अद्याप मुंबई पोलिसांना मिळू शकलेला नाही.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button