महायुतीत कलगीतुरा : रामदास कदम यांनी ३० वर्षात काय उपटले?
भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण यांचे शिंदे गटाच्या रामदास कदमांना सवाल

मुंबई : विधानसभा निवडणुक जवळ येत असतानाच नेत्यामंडळीमध्ये चांगलेच वाक्युध्द सुरु झाले आहे. महायुती-महाआघाडीतील नेत्यामध्ये तर वाद-िववाद होतच असतात. पण आता महायुतीच्या मित्रपक्षामध्येसुध्दा चांगलेच विवाद होताना िदसत आहे.
रामदास कदम यांनी मुंबई-गोवा महामार्गावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना लक्ष केले, त्याला प्रत्युत्तर देताना चव्हाण यांनी कदमाना ३० वर्षात काय उपटले असे सवाल केला.
प्रभू रामचंद्रांचा वनवास १४ वर्षांनी संपला; पण मुंबई-गोवा महामार्ग १४ वर्षांत झाला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी कुचकामी रवींद्र चव्हाण यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायला हवा, असे म्हणत शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी म्हटले.
यावर रवींद्र चव्हाण यांनी आम्ही युतीधर्म पाळतो याचा अर्थ असा नाही की कोणी काही बोलेल. तोंड सांभाळून बोलायचे नाही तर तोंड फोडल्या शिवाय राहणार नाही, असे म्हणत रामदास कदमांवर जोरदार हल्ला चढवला. गेल्या ४० वर्षांच्या काळात रामदास कदम आमदार, मंत्री म्हणून कोकणचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी या काळात विकास कामे सोडाच, पण इतर विकास कामांचे कोणते दिवे लावले ते पहिले स्पष्ट करावे, असे आव्हान मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी येथे दिले.
दरम्यान, शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले की, मी दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र पाठवले आहे. तुमचा सार्वजनिक बांधकाम मंत्री त्याला आवर घाला. तो युती तोडण्याचे काम करतोय. दापोलीत जी भाजपा आहे ती आमच्या मुळावर कशी उठलीय ते मी दिल्लीला कळवले आहे. १४ वर्षानंतर प्रभू रामाचा वनवास संपला परंतु मुंबई-गोवा महामार्गाचा वनवास संपला नाही. नितीन गडकरींनी स्वत: लक्ष घालावे यासाठी शिष्टमंडळाला घेऊन भेट घेणार आहे. आम्ही काय पाप केलंय, रवींद्र चव्हाण हे चमकोगिरी करतात. काम करत नाही. खड्डेमय रस्ते आहेत. नुसते पाहणी दौरे कशासाठी, रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री त्यांचा राजीनामा घ्यायला हवा, अशी भूमिका त्यांनी मांडली.