क्राइम
कोयत्याने वार करून युवकाचा खून, महुद ता. सांगोला येथील घटना
सांगोला पोलीसात तिघांविरोधात गुन्हा दाखल

सांगोला : प्रतिनिधी
किरकोळ भांडणाच्या कारणावरून चिडून एका ३२ वर्षीय युवकाच्या डोक्यात, मानेवर, हातावर, छाती व पोटावर कोयत्याने वार करत त्यास गंभीर जखमी करून खुन केला असल्याची घटना, सांगोला तालुक्यातील महूद येथे दिनांक ११ जुलै रोजी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी दिनांक १२ जुलै रोजी निशा प्रभाकर कांबळे रा. साठेनगर, महुद (बु) ता. सांगोला यांनी सांगोला पोलीसात शुभम उर्फ आबा भागवत जाधव, ऋषीकेश उर्फ गोट्या भिमराव शिरतोडे , सोनु उर्फ अनिल यशवंत चव्हाण सर्व रा. महुद ( बु. ) ता. सांगोला याच्याविरोधात फिर्याद दिली आहे. तर सुनिल अनिल कांबळे (वय ३२) रा. पवार वाडी रोड, महुद बु।। ता. सांगोला असे खून झालेल्या युवकाचे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ११ जुलै रोजी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी ह्या घरी असताना, घराच्या मागे असणाऱ्या समाज मंदीराकडे मोठा कालवा ऐकू आला, म्हणून काय झाले पाहण्यासाठी फिर्यादी ह्या तिकडे जात असताना मुलगा चैतन्य हा पळत घराकडे आला. फिर्यादी यांनी त्याला काय झाले असे विचारले असता, अंकलला ( सुनिल कांबळे ) मारले असे म्हणून घरात पळाला. फिर्यादी हे समाज मंदीराकडे गेल्या असता समाज मंदीरा जवळील रोडलगत चुलत दिर सुनिल कांबळे हे जमीनीवर पडलेले दिसले.
त्याच्या डोक्यावर, मानेवर, पोटावर, हातावर वार झालेले व त्यातुन रक्त येत असल्याचे दिसले, त्यास दोन इसम हातात लोखंडी कोयत्याने सुनिल याच्या अंगावर वार करत होते. दिर सुनिल हा खाली निपचित पडला होता. बरेच लोक पाहत होते. परंतु त्याच्या हातात कोयता होता, आणि ते कोठेही वार करत असल्यामुळे भितीने कोणीही पुढे गेले नाही.
फिर्यादी यांचे चुलत दिर खाली पडलेले व त्यास दोघेजण कोयत्याने वार करत असल्याने फिर्यादी ह्या मध्ये पडल्या व त्यांना हात जोडून, खाली बसून भाऊ मारु नका, मी तुमच्या पाया पडते असे म्हणून दिरावर आडवे पडल्या, त्यावेळी त्यातील एकाने उजव्या हातावर जोराने वार केला आणि रोडवरुन आटपाडीकडे पळून गेले.
दिर सुनिल हे गंभीर जखमी असल्याने त्यास महुद आय. सी. यु. येथे नेहले. त्यांनी लाईफलाईन पंढरपुर येथे नेण्यास सांगितले, त्याप्रमाणे लाईफलाईन पंढरपुर येथे आणले असता, त्यांनी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यास सांगितले. तेथील नेहल्यावर डॉक्टरांनी तपासून सुनिल हा मयत झाला असल्याचे सांगितले.
तसेच घटना घडण्यापुर्वी पंधरा ते वीस मिनीटे अगोदर समाज मंदीर, साठेनगर येथे ऋषीकेश उर्फ गोट्या शिरतोडे आणि सोनु उर्फ अनिल चव्हाण यांनी गणेश आणि सुनिल या दोघांना पूर्वी झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरून तुम्हाला बघून घेतो, सोडत नसतो असे म्हणून दम देऊन गेले होते. त्यानंतर लगेच दहा ते पंधरा मिनीटात परत येऊन सुनील कांबळे याच्यावर कोयत्यासारख्या हात्याराने वार करून खुन केला आहे ,असे पोलीसात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे.