
नवी दिल्ली : वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिध्द असलेल्या भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावत यांनी विराेधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टिका केली. कंगना राणावत यांनी राहुल गांधी यांना धाेकादायक तसेच विषारी आणि विध्वंसक म्हटले आहे, ते पंतप्रधान नाही बनवू शकले म्हणून देश मिटवायला निघाले असल्याचा आराेप केला.
हिंडनबर्ग अहवालानंतर राहुल गांधी यांनी माेदी सरकारला काेंडीत पकडले. त्यांनी या प्रकरणी सरकारला अनेक प्रश्न विचारले तसेच अदानी ग्रुप आणि सेबी यांच्यातील संगनमताचा आराेपही केला, यावरून कंगना राणावत यांनी राहुल गांधीवर हे आराेप केले.
भाजप खासदार कंगना राणावत यांनी एक्स या त्यांच्या साेशल मिडीयावर पाेस्ट करत टिका केली. त्यात त्यांनी लिहिले की, राहुल गांधी हा सर्वात धाेकादायक माणूस आहे. तसेच ते विषारी आणि विध्वंशक आहेत. ते पंतप्रधान हाेउ शकत नाही तर ते या देशालाही नष्ट करू शकतात. आमच्या शेअर बाजाराला लक्ष्य करणाèया हिंडनबर्गच्या अहवालाचे त्यांनी समर्थन केले, जाे की ताे अहवाल खाेटा ठरला.