क्राइममहाराष्ट्र

सांगोला येथे सीमावर्ती सोलापूर ग्रामीण व सांगली पोलीस अधिकाऱ्यांची बैठक संपन्न

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर 'कम्युनिटी' पोलिसिंगवर भर देण्याच्या सूचना

सांगोला : प्रतिनिधी

विधानसभा निवडणूक २०२४ शांततेत, भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी व निवडणुक कार्यकाळात गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस व सांगली जिल्हा पोलीस यांची संयुक्त बैठक शुक्रवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी कमलापूर ता. सांगोला येथे पार पडली.

पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीणचे अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

सदर बैठकीमध्ये सोलापूर व सांगली सीमाभागातील पाहिजे असलेले सराईत गुन्हेगार व फरारी असलेले आरोपी यांना अटक करणे, अवैध व्यवसाय करणारे आरोपी दारु, गांजाची वाहतुक करणारे आरोपी व विक्री करणारे आरोपी यांच्यावर कारवाई करणे. तसेच पोलीस ठाणे हद्दीतील सराईत आरोपी, गुंड प्रवृत्तीच्या इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या.

पोलीस प्रशासनातील सर्वांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या. तसेच निवडणुक भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस व जनता यांच्यातील समन्वय वाढवून ‘कम्युनीटी पोलीसींग’ वर भर देण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा विक्रांत गायकवाड , जत उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल साळुंखे , विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, पो. नि. महेश ढवाण ( पो.नि. मंगळवेढा ) , ज्योतीराम पाटील (पो. नि. कवठे महंकाळ), श्री. बिजली ( पो. नि. जत), संदीप कांबळे ( स. पो. नि. उमदी, जि. सांगली), रमेश जाधव (स.पो.नि आटपाडी), सचिन जगताप (स.पो.नि सांगोला), विनायक माहुरकर ( पो.उप.नि, सांगोला) उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button