
नवी दिल्ली : बाबा सिद्दिकीच्या हत्येप्रकरणी नवी मुंबई, कर्जत आणि डोंबिवली परिसरातून पाच आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या सर्वांचे लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध आहेत. मुंबई गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेले चार आरोपी २१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत आहेत.
मृत्यूनंतरही बदनामी करायची, हे हीन कृत्य फक्त भाजपच करू शकते. नाहीतर एका खुन्याला पत्रकार परिषद कशी घेवू दिली जाते?
दाल मे कुछ काला है!#LawlessState pic.twitter.com/uq10mxHA8S— Nana Patole (@NANA_PATOLE) October 19, 2024
दरम्यान, अश्यातच दिल्लीमधून एका खुनाच्या कारवाईत अटक असलेल्या एका आरोपीनी सिद्दीकीविषयी गंभीर आरोप केले आहे. दिल्लीमध्ये एका व्यायामशाळेच्या मालकाची हत्या केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशमधून बिश्नोई टोळीच्या योगेश कुमारला नुकतीच अटक झाली.
हा आरोपी पोलिसांच्या कोठडीत असताना त्याने माध्यमांशी संवाद साधला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून त्यात त्याने बाबा सिद्दीकी यांच्यावर विविध आरोप केले आहेत.
“बाबा सिद्दीकी हे चांगले व्यक्ती नव्हते, त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेला होता. तसेच त्यांचे आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचे संबंध होते”, असा दावा योगेश कुमारने केला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सदर व्हिडीओ आपल्या एक्स अकाऊंटवर टाकून भाजपावर टीका केली आहे. “मृत्यूनंतरही बदनामी करायची, हे हीन कृत्य फक्त भाजपाच करू शकते. नाहीतर एका खुन्याला पत्रकार परिषद कशी घेऊ दिली जाते? दाल मे कुछ काला है.” असं नाना पटोले म्हणाले आहेत.