लॉजवर गेलेल्या प्रेमीयुगुलाच्या लव्हस्टोरीचा भयानक अंत…
पुणे : पुणे शहरात गुन्ह्याचे प्रमाण वाढतच असून आज पिंपरी िचंचवड शहरात अंगावर शहारे येणारी घटना समोर आली आहे. प्रियकराने प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार करुन नंतर आत्महत्या केली. खराळवाडी परिसरामध्ये असणाऱ्या एका लॉजवर हा प्रकार घडला. प्रियकराने केलेल्या हल्ल्यात जखमी असलेल्या तरुणीला यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तरुणीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, काही तासांतच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली आहे.
नितेश नरेश मिनेकर आणि करिष्मा ईश्वर घुमाने असं हत्या आणि आत्महत्या करणाऱ्या प्रेमीयुगालाचे नाव आहे. हा सर्व प्रकार प्रेम प्रकरणातून घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. प्रेयसी हल्ल्यातून बचावली आहे. गुरुवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील खराळवाडी परिसरात एक लॉज आहे. त्या लॉजवर प्रियकर आणि प्रेयसी भेटले होते. तिथे त्यांच्यात वाद देखील झाले असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे रागातून प्रियकराने आपल्या प्रेयसीवर धारदार शास्त्राने वार केले. वार केल्यानंतर प्रियकराने स्वतः देखील आत्महत्या केली. जखमी प्रेयसीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
गुरुवारी दुपारी प्रियकर आणि प्रेयसी लॉजमध्ये आल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. लॉजच्या रिसेप्शन आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये तरुण आणि तरुणी एकत्र येताना कैद झाले आहेत. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. अद्याप याचे खरे कारण समोर आले नसून प्रियकराला आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.