भारतराजकारण

निवडणुकीच्या मैदानात कुस्तीपटू विनेश फोगाटने भाजप उमेदवाराला केले चितपट

चंदीगड : कुस्तीपटू विनेश फोगाट हिने हरियाणातील जुलाना विधानसभेतून बाजी मारली आहे. काँग्रेसकडून उभी असलेल्या विनेश फोगाटने भाजपचे उमेदवार कॅप्टन योगेश बैरागी यांचा पराभव करत विजय मिळवला आहे. 6015 मतांनी विनेश फोगाटने भाजपच्या योगेश बैरागी यांना चितपट केले आहे.

जुलाना मतदारसंघात विनेश फोगाट आणि योगेश बैरागी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. पहिल्या चार फेऱ्यांमध्ये पिछाडीवर असलेल्या विनेश फोगाटने पुढील सर्व मतमोजणीच्या फेरीत आघाडीवर राहिली आणि विजयी झाली. दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीपूर्वी अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटने निवृत्तीची घोषणा केली होती. यानंतर 6 सप्टेंबरला विनेशने ऑलिम्पिक कुस्तीपटू बजरंग पुनियासोबत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यानंतर काँग्रेसने जुलानामधून विनेश फोगाटला तिकीट दिली.

विनेश फोगाटला किती मते मिळाली?
विनेश फोगाटला जुलाना येथील जनतेने पाठिंबा दिला असून तिला एकूण 65080 मते मिळाली आहेत. तर प्रतिस्पर्धी कॅप्टन सिंग वैरागी यांना 59065 मतांवर समाधान मानावे लागले आणि ते दुसऱ्या स्थानावर राहिले. त्याचवेळी आम आदमी पक्षाच्या उमेदवार कविता राणी यांना केवळ 1280 मते मिळाली.

आंदोलनातील सहकारी बजरंग पुनियाने दिल्या शुभेच्छा?
देशाची कन्या विनेश फोगाटला विजयाबद्दल खूप खूप अभिनंदन….ही लढत केवळ एका जुलाना जागेसाठी नव्हती…केवळ पक्षांमधील लढत नव्हती…हा लढा देशातील सर्वात बलाढ्य जुलमी शक्तींविरुद्ध होता. आणि यामध्ये विनेश फोगाट जिंकली, असं कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाला.

विनेश फोगाटचा कुस्तीला रामराम-
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये विनेश फोगाटने उपांत्य फेरीपर्यंत मोठ्या कुस्तीपटूंचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. मात्र महिलांच्या 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीपूर्वीच विनेश फोगाटला जास्त वजन भरल्याने अपात्र ठरवण्यात आले. यानंतर विनेश फोगटने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर विनेश फोगाटने 6 सप्टेंबर रोजी तिचा सहकारी कुस्तीपटू बजरंग पुनियासह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button