बदनापुर शहरामध्ये गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने पोस्टाच्या पार्सलद्वारे मागविलेल्या 3 तलवारी केल्या जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
बदनापूर : जालना जिल्हयातील अवैध शस्त्रे बाळगणा-या आरोपीची माहिती घेऊन त्यांचा शोध घेणे कामी विशेष मोहीम राबवणे संदर्भात पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल यांनी स्थानिक गुन्हा शाखेला दिल्याने स्थानिक गुन्हा शाखा विशेष मोहीम राबवित दररोज कारवाई करत असतांना ११ नोहबेर रोजी बदनापूर येथे पोस्टाने तलवारी मागविण्यात आल्याची माहिती मिळताच गुन्हा शाखा पोलीस निरीक्षक पंकज जाधव व त्यांच्या टीम ने सापडे रचून दोघांना तीन ताल्वारीसहित रंगेहाथ पकडले असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे,स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईने स्थानिक पोलिसांविषयी प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे हे विशेष !
जालना जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल ,अपर पोलीस अधीक्षक नोपाणी व उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांचे सुचनेवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करुन जालना जिल्हा हद्दीतील अवैध शस्त्रे बाळगणा-या आरोपीतांची माहिती घेऊन शोध घेत असतांना खब-या मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, बदनापुर येथील इसम नामे अबुजर सय्यद जबिर रा. बदनापुर याने त्याचे नावावर धारधार तलवारी पोस्टाद्वारे मागिवलेल्या असुन सदर तलवारी डिलीव्हरी घेण्यासाठी दोघेजण एका मोटारसायकलवर येणार असल्याची माहिती प्राप्त झाली.
सदर माहिती मिळाल्यावर सदरची माहिती वरिष्टांना कळवून वरिष्टांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार बदनापुर शहरातील पोस्ट ऑफिसच्या आवारात सापळा लावुन गुप्त बातमीदारांनी कळविलेल्या वर्णनाचे दोन इसम एका मोटारसायकलवर एक खाकी रंगाचा आयताकृती बॉक्स घेऊन जातांना दिसल्याने सदर इसमांना मोटारसायकलसह ताब्यात घेऊन त्यांना विचारपुस केली असता, त्यांनी त्यांचे नाव अबुजर सय्यद जबीर वय 19 वर्ष , आवेश शबाब कुरेशी वय 19 वर्ष दोघे रा. बाजार गल्ली बदनापुर असे सांगितले त्यांचे ताब्यातील खाकी रंगाच्या आयताकृती पुठ्याच्या बाँक्स ची पंचासमक्ष झडती घेतली.
असता, त्यामध्ये 9000 रु किंमतीच्या 03 धारधार तलवारी असा मुद्देमाल मिळुन आला असुन पंचासमक्ष जप्त करण्यात आले आहे. नमुद दोन्ही इसमांविरुध्द पोलीस ठाणे बदनापुर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाईने मात्र बदनापूर पोलिसांविषयी प्रश्न चिन्ह निर्माण झाला असे बोलले जाते. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, पोलीस अंमलदार, रुस्तुम जैवाळ, भाऊराव गायके, सागर बाविस्कर, सोपान क्षिरसागर, धीरज भोसले, योगेश संहाणे यांनी केली.