महाराष्ट्रराजकारण

दैत्यांचा नेहमी पराभव होतो, महाविकास आघाडीच्या पराभवानंतर कंगना रणौतची प्रतिक्रिया

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, दैत्यांचा नेहमी पराभव होतो. माझं घर ज्यांनी तोडलं, मला शिवीगाळ केला. त्यावरून मला वाटतं कुठेतरी बुद्धी भ्रष्ट झाली होती, ते दिसून आलंच.’ उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना कंगना रणौत यांची बेकायदेशीर बांधकाम मुंबई महानगरपालिकेने पाडले होते. त्याचा राग कंगनाच्या बोलण्यातून दिसून येतो.

कंगना म्हणाली की, ‘आमच्या पक्षासाठी हा ऐतिहासिक विजय आहे. महाराष्ट्राचे आम्ही आभार मानतो. त्याचबरोबर भारताच्या जनतेचेही मी आभार मानते. महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होईल याबद्दलचा निर्णय पक्ष घेईल. आमच्याकडे अनेक दिग्गज लोक आहेत ते याबद्दलचा निर्णय घेतील. उद्धव ठाकरेंचा आणि महाविकास आघाडीचा जो पराभव झाला तो अपेक्षित होता कारण, दैत्यांचा पराभव होतो हे आपण इतिहासामध्ये पाहिलं आहे.’

‘दैत्य आणि देवता यांना आपण कसं ओळखतो? जे महिलांचा सन्मान करत नाहीत ते दैत्य असतात. महिलांचा जे सन्मान करतात ते देव असतात. आमच्या पक्षाने महिलांना ३३% आरक्षण, शौचालयं, राशन, गॅस सिलेंडर दिले आहेत. त्यावरून कळतं देवता कोण आणि दैत्य कोण. दैत्यांचा नेहमी पराभव झाला. माझं घर ज्यांनी तोडलं, मला शिवीगाळ केला. त्यावरून मला वाटतं कुठेतरी बुद्धी भ्रष्ट झाली होती, ते दिसून आलंच.’ असं कंगना पुढे म्हणाली.

काँग्रेसबद्दल विचारलं असता कंगना म्हणाली की, ‘हा देश खूप जणांच्या बलिदानाने तयार झाला आहे आणि कोणाच्या बोलण्याने किंवा मुर्खांच्या एकत्र येण्याने देशाचे तुकडे नाही होऊ शकत आणि आम्ही ते होऊसुद्धा देणार नाही.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button