मेसचा डबा देण्यास गेलेल्या महिलेकडे शारीरिक संबंधाची मागणी

छत्रपती संभाजीनगर ; मेसचा डब्बा देण्यास गेलेल्या महिलेकडे एकाने शारीरिक संबंधाची मागणी केली. ही संतापजनक घटना ४ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा आठच्या सुमारास सिडको एन ९ भागात घडली. शिवप्रसाद असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी महिला ही मेस चालविते. तिच्याकडे आरोपी शिवप्रसाद याने दोन दिवसांपासून डब्बा लावला आहे. त्यामुळे महिला ही सकाळी शिवप्रसाद याच्या घरी पोह्याचा डब्बा घेऊन गेली. शिवप्रसाद याच्या घरी गेल्यानंतर त्या सोफ्यावर बसल्या. तेव्हा त्यांनी शिवप्रसाद याला काका हा तुमचा डब्बा असे म्हणत त्याच्याकडे पोह्याचा डब्बा दिला. त्यानंतर शिवप्रसाद याने तिला ताई मी तुम्हाला एक बोलू का असे विचारले. तेव्हा महिलेने बोला ना काका काय बोलायचे आहे असे म्हटले. त्यावर शिवप्रसाद याने तुम्ही माझ्याशी शारीरिक संबंध ठेवा, मी तुम्हाला एक लाख रुपये देतो असे म्हणत विनयभंग केला. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.