
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या सहाय्यक उपनिरीक्षकाने स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. मंगळवारी, ६ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास सिव्हिल लाइन्स बॅरेकमधील त्यांच्या खोलीत या पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उत्तराखंडचे रहिवासी होते आणि 1994 मध्ये दिल्ली पोलिसात रुजू झाले होते. या घटनेची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली आहे. माहितीनंतर गुन्हे शाखेचे पथक आणि एफएसएस रोहिणी पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही.
मृत पोलीस कर्मचाऱ्याने कौटुंबिक वादातून हे भयानक पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या (BNN) कलम 194 अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जात आहे.