बिहारच्या लेडी सिंघम IPS काम्या मिश्रा यांचा राजीनामा
दरभंगा : बिहारच्या लेडी ‘सिंघम’ IPS काम्या मिश्रा यांनी राजीनामा दिला आहे. काम्या मिश्रा यांनी बिहार पोलिस मुख्यालयाला एक पत्र पाठवले असून, त्यामध्ये तिने वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. जीतन साहनी हत्याकांडासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीचे नेतृत्व काम्या मिश्रा करत होत्या.
जितन साहनी हत्या प्रकरणाच्या एसआयटीचे करत होत्या नेतृत्व
आयपीएस काम्या मिश्रा सध्या दरभंगा येथे ग्रामीण एसपी म्हणून तैनात आहेत. त्यांच्यावर जितन साहनी खून प्रकरणाचा उलगडा जबाबदारी सोपवण्यात आली होती. काम्या मिश्राचे पती अवधेश सरोज हे देखील आयपीएस आहेत. ते २०२१ च्या बॅचचा बिहार केडरचे पोलिस अधिकारी आहेत. तर ओडिशाच्या राहणारया काम्या लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या. त्यांना बारावीच्या परीक्षेत ९८ टक्के गुण मिळाले.
अवघ्या २२ व्या वर्षी आयपीएस
काम्या मिश्रा यांनी दिल्ली विद्यापीठाच्या प्रसिद्ध लेडी श्रीराम कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे. ग्रॅज्युएशनच्या काळातच त्यांनी नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली आणि वयाच्या 22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. यापूर्वी त्यांना हिमाचल केडर देण्यात आले होते, परंतु नंतर त्यांची बिहार केडरमध्ये बदली करण्यात आली.