क्राइम

पप्पी दे, हजेरीची चिंता सोड, कॉलेज व्यवस्थापक आणि महिला शिक्षिकेचा VIDEO व्हायरल

उन्नाव : येथील कॉलेजमधील व्यवस्थापकाचा महिला शिक्षिकेकडे रजेसाठी अजब मागणी करताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शहरातील एका खासगी इंटर कॉलेजमधील आहे. व्हिडीओमध्ये कॉलेज व्यवस्थापक अश्लील हावभाव करत ऑफिसमध्येच महिला शिक्षिकेकडून पप्पीची (KISS)  मागणी करत आहे. महिला शिक्षिका अर्ध्या दिवसाची रजा मागत आहे. त्यावर व्यवस्थापक किसची मागणी स्वीकारण्यास सांगत आहेत. व्यवस्थापकाने व्हायरल व्हिडिओ चुकीचा असल्याने सांग बदनामी करण्याचे षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे.

उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील जय हनुमान इंटर कॉलेज पुरण नगरचा हा व्हिडिओ मंगळवारी व्हायरल झाला. २५ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थापक रवी प्रताप गोयल एका महिला शिक्षिकेकडे अजब मागणी करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ कॉलेजच्या ऑफिसमधलाच असल्याचे समजतेय. शिक्षिका कॉलेज व्यवस्थापकाकडे अर्ध्या दिवसाची रजा रजा मागत आहेत. त्यावर व्यवस्थापक एक अट मान्य करण्यास सांगत आहेत.

यावर महिला शिक्षिका विचारते की कोणती अट मान्य करावी लागेल. त्यावर मॅनेजर गालावर बोट ठेवतो आणि KISS देण्यास सांगतो. एवढंच नाही तर मॅनेजर सुद्धा सांगतो की फक्त किस दे आणि रजेची चिंता विसरुन जा. यावर शिक्षिका नकार देत हे शक्य नसल्याचे सांगते. व्हिडिओ पाहून असे दिसते की महिला शिक्षिकेने स्वतः मॅनेजरच्या कृत्याचा पर्दाफाश करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मॅनेजरने बुधवारी एक व्हिडीओ जारी करून स्वत:ला निर्दोष असल्याचे सांगितले आहे.  आपली बदनामी करण्यासाठी हा व्हिडीओ बनवला असून त्यात छेडछाड केल्याचे सांगितले. मॅनेजरच्या स्पष्टीकरणाच्या व्हिडिओमध्ये त्याचे कर्मचारीही त्याची पाठराखण करताना दिसत आहेत. त्याचवेळी जिल्हा शाळा निरीक्षक एसपी सिंह म्हणाले की, त्यांनी आजच हा व्हिडिओ पाहिला आहे, हा व्हिडिओ अतिशय लाजिरवाणा आहे. याची चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button