क्राइम स्टोरी

Crime Story : कर्जाचा फास प्राणावर चांगलाच बेतला..! वसुलीसाठी सावकाराने इंदूचा जीव घेतला !

सांगली (जत) : सावकारी कर्जाचा फास एकदा का माणसाच्या गळ्याला लागला की मग तो सुटता सुटत नाही. त्यातच कर्जाचे पैसे वेळेवर दिले नाहीत की मग सावकाराचा पैसे वसुलीसाठी तगादा लागतो. त्यातून सावकार आणि कर्ज घेणारा यांच्यात भांडणे होतात आणि अशीच भांडणे विकोपाला गेली कि त्यातून एखाद्याचा जीव जातो. सांगली जिल्ह्यातील जत येथे एका महिलेने सावकाराकडून ४ लाखांचे कर्ज घेतले होते. पण ते तिला वेळेवर फेडता आले नाही. त्यामुळे सावकाराने कर्जाच्या परतफेडीसाठी तगादा लावला. त्यातून दोघांमध्ये वाद सुरु झाले आणि याच वादात सावकाराने त्या महिलेची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी सावकाराला अटक केली आहे.

प्रांपचीक जीवनात अनेक अडचणी येत असतात. त्या सोडविण्यासाठी काही जण उधार उसणवारी करतात तर काही जण ओळखीच्या लोकांकडून व्याजाने पैसे घेत असतात. पैसे घेतेवेळी ती रक्कम वेळेत त्यांना परत दयायला हवी नाही तर त्या व्यवहारातून त्याचे बिनसते आणि खूनाची घटना घडते. खंडनाळ येथे पाटील वस्तीवर इंदुबाई पांडुरंग बिराजदार या आपल्या मुलगा आणि मुलीसह राहयला आहेत. दुसरी मुलगी ही पोलीस भरतीची तयारी करीत असल्याने ती मुंबईत पाहुण्याकडे राहते. तर इंदुबाईचे पती पांडुरंग हे मुंबई येथे गोदी कामगार म्हणून काम करीत असल्याने ते तेथेच राहतात. महिना दोन महिन्यातून ते आपल्या गावी खंडनाळ येथे असतात.

बिराजदार यांची थोडी फार शेती असून त्या शेतीवरच त्याचा उदरनिर्वाह चालत असे. हल्ली शेती करणे खरे तर शेतकऱ्याला परवडत नाही म्हणून अनेकजण शेतीबरोबरच दूधाचा जोडधंदा करत आहेत. इंदुबाई यांनी ही शेती बरोबर दोन जनावरे पाळली होती. ती जनावरे विकत घेण्यासाठी त्याच्याकडे पुरेशी रक्कम नसल्याने त्यांनी गावातीलच तम्मा कुलाळ याचेकडून चार लाख रुपये हात उसणे घेतले होते. तम्मा कुलाळ याच्या शेतीला लागूनच बिराजदार याची शेती असल्याने तम्मा याने त्या शेतीकडे बघूनच इंदुबाई बिराजदार यांना चार लाख रूपये दिले होते. इंदुवाई याचा मुलगा बबलू हा गावातीलच एका दूध संकलन केंद्रात कामाला आहे. जनावरांच्या दुधावर आणि मुलाच्या पगारावर इंदुबाई यांनी तम्मा याचे चार लाख रूपये देणे भागवण्याचे ठरवले होते. परंतु माणूस ठरवतो एक आणि होते दुसरेच. तसे इंदुबाईचेही झाले होते. गेल्या एक दोन वर्षापासून त्यांच्या संसाराची घड़ी ही बसत नव्हती. काही केले तरी हाता तोंडाचा घास पोटाला येत नव्हता. मुलाचा पगार घर खर्चाला जात होता. तर नव-या पगार त्याचा त्यालाच पुरत नसल्याने तो ही त्यांना पैसे पाठवत नव्हता.

इंदुबाई बिराजदार यांना चार लाख रूपये देऊन दोन वर्ष झाली असल्याने आणि त्यांनी त्यातील एक रूपया परत केले नसल्याने तम्मा कुलाळ हा त्याच्या मागे माझी रक्कम मला परत दया म्हणून मागे लागला. ब-याच वेळेला इंदुबाई यांनी तम्मा याला काही तरी कारण सांगून आजचे मरण उदयावर नेत होत्या. पैसे परत देण्याचे त्या नाव काढत नसल्याने तम्मा हा हवालदिल झाला होता. त्याला आता आपली रक्कम बुडते की काय असे वाटत होते. रक्कम मोठी असल्याने इंदुबाई यांना ही ती रक्कम परत देताना अनेक अडचणी येत होत्या. कुठून पैशाची व्यवस्था करायची आणि तम्मा याची रक्कम परत करायची याचा त्या विचार करत होत्या. त्यासाठी त्यांनी आपली जनावरे ही विकायला काढली, परंतु त्या कर्जबाजारी आल्या असल्याचे अनेकांना माहित होते त्यामुळे त्याची जनावरे कमी किमतीत घेणारे मागत होते. बरे जनावरे विकून ही तम्माची रकम जात नव्हती. त्यामुळे काय करायचे असा त्याच्या पुढे प्रश्न पडला.

दिवसा मागून दिवस जात होते. तम्माने त्याच्या मागे पैशाचा तगादा लावला होता. त्यामुळे त्या ही जेरीस आल्या होत्या घरची कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असताना त्यांना नाकी नऊ झाले होते. काय करून तम्मा याचे देणे भागवायचे याचा त्या विचार करीत होत्या. त्यातच मुलगी प्रतिक्षा ही वयात आली असल्याने तिचे वर्ष दोन वर्षात लग्न करून देणे गरजेचे होते. शेती विकून ही चालणार नव्हते. त्यामुळे उद्या मुलाच्या लग्नात अडचण निर्माण होणार होती. अलिकडे तम्माने त्याच्या मागे आपल्या पैशाच तगादा सारखा लावला होता. त्यातून त्याची दोन तीन वेळा भांडणे ही झाली होती. त्या आज उद्या करीत असल्याने तम्मा हा त्याचेवर बिडत होता. त्यातच त्याला आपली रक्कम बुडते की काय असे वाटत होते.

इंदुबाई या शेतही विकायला तयार नव्हत्या. मग त्या आपली देणी कशी देणार याचे त्याला ही कोडे पडले होते. काही करून त्याच्याकडून आपली रकम वसूल करायची याचा तो विचार करीत असताना इंदुबाई या त्याला वायद्यावर वायदा देत होत्या याचा त्याला राग येत होता. तो माझी रकम मला परत दया तुम्ही काय वाटेल ते करा असे सांगत होता.

हल्ली तर त्या काही आपली रक्कम परत देणार नाहीत याची त्याला खात्री पटली होती म्हणून तो त्याच्या मागे लागला होता. वाटेत कुठे त्या भेटल्या की आपल्या पैशाचा विषय काढून तो त्याचेबरोबर भांडण काढत होता. सोमवार दि.८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजणेच्या दरम्यान इंदुबाई या आपली मुलगी प्रतिक्षा हिला घेऊन आवटी वस्तीवरील आपल्या नातेवाईकांच्या लहान बाळाला बघायला गेल्या होत्या. तेथून त्या परत रात्री ८.०० वाजणेच्या सुमारास आपल्या पाटील बस्तीवरील घराकडे परत येत असताना तिने मुलगी प्रतिक्षा हिला माझे जर काम आहे तु घराकडे जा असे सांगून इंदुबाई या दुस-या रस्त्याने गेल्या. खरे तर तिला त्यावेळी तम्मा याचा फोन आला होता. त्याने तिला पैशाबाबत बोलायचे आहे येवून भेट असे निरोप दिला होता. म्हणून ती त्याला भेटायला चालली होती तेवढयात तिला वाटेत तम्मा भेटला. त्याने तिला अंधारात आडवाटेने नेवून तुकाराम कुलाळ याच्या बाजरीच्या शेतात नेले. तेथे त्याने तिच्या अंगचटीला जात झोंबाझोबी सुरू केली.

तिने त्याला बाजुला ढकलून दिले. तो तिची वाट अडवत होता. नेहमी प्रमाणे त्याने इंदुबाई यांना वाटेत अडवून माझे पैसे द्या म्हणून भांडण काढले. रात्रीच्या अंधारात ते दोघे भांडत असताना शब्दाला शब्द वाढत गेला. त्यावेळी दोघात झटापट सुरू झाली. ती बाई माणुस असताना देखील त्याने रागाच्या भरात तिच्या अंगावर हात टाकला. ती ही वाघीणीसारखी चवताळली होती. तिने ही रागाच्या भरात त्याच्या शर्टाला हात लावला. तो तिला शिव्या देत आता तुला सोडत नाही म्हणून तिला मारहाण करत खाली पाहते. ती ओरडत होती. तो तिला लाथाबुक्यांनी मारहाण करू लागला.

तशातच त्याने बाजुलाच पडलेली लाकडी काठी उचलली आणि तिच्या डोक्यात जोरात हाणली. त्यासरशी तिचे डोके फुटले. ती रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होती. काही क्षणातच ती शांत झाली. तिचा जागीच मृत्यू झाला. आता काय करायचे याचा विचार तम्मा करू लागला. त्याने तिच्या अंगावरचे कपडे, दागिणे काढून घेतले. तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची म्हणून त्याने तिचा मृतदेह ओढत ओढत जवळच्या तुकाराम कुलाळ याच्या विहिरीजवळ आणला. पावसाळा सुरू असल्याने विहिर पाण्याने भरली होती. त्याने तिचा मृतदेह त्या विहिरीत टाकला आणि तेथून निघून गेला.

सोमवार रात्री उशिरा दूध संकलन केंद्रातून मुलगा बबलू हा घराकडे परत आला. त्यावेळी त्याला घरात आई दिसली नाही म्हणून त्याने बहिण प्रतिक्षाकडे चौकशी केली असता तिने आवटी वस्तीवरुन आपल्याला घराकडे पाठवून ती दुसरीकडे काम आहे असे सांगून निघून गेल्याचे सांगितले. तिने तसे सांगितल्यावर बबलू याने रात्री उशिरा पर्यंत आपल्या आईचा आवटी वस्तीवर आणि आजुबाजुता शोध घेतला. परंतु तिचा शोध काही लागला नाही. दुसऱ्या दिवशी ही त्याने गावात आणि बाजुच्या गावातही तिचा शोध घेतला. पै पाहुण्यात ही त्याने तिचा शोध घेतला. काही केल्या तिथा शोध लागला नाही. शेवटी कंटाळून नातेवाईकांच्या सांगण्यावरून उमदी पोलीस ठाण्याला आपली आई बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवणार होता. तेवढयात बुधवार दि.१० जुलै रोजी दुपारी तुकाराम कुलाळ याच्या विहिरीत एका महिलेचा मृतदेह तरंगत असल्याचे एका इसमाला दिसून आले. त्याने गावात येवून या घटनेची माहिती लोकांना दिली. तशी ही माहिती बबलू याला मिळाल्यावर त्याने त्या ठिकाणी जावून पाहिले असता ती त्याची आई इंदुबाई बिराजदार होती. तिच्या डोक्यावर मारहाणीच्या खुणा दिसत होत्या.

कुणी तरी या घटनेची माहिती उमदी पोलीसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस ही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या विहिरीतून इंदुबाई बिराजदार याचे प्रेत ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले. विहिरीच्या बाजुला असणाऱ्या कचऱ्याच्या ढिगा-यात कपडे पडले होते. मयत इंदुबाई यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिणे ही नाहीसे झाले होते. पोलीसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उमदी येथील सरकारी स्णालयात पाठवून दिला.

पोलिसांनी या घटनेची माहिती मयत इंदुबाई याची मुलगी प्रतिक्षा हिच्याकडून घेतली. घटनास्थळावरील दृष्यावरून इंदुबाई याचा खून कुणी तरी चोरीच्या उद्देशाने केला असावा असे वाटत होते. परंतु पोलीसांना मयत इंदुबाई याच्या विषयी वेगळीच माहिती मिळाली. इंदुबाई याचे तम्मा कुलाळ याच्या बरोबर भांडण झाल्याची माहिती मिळाली. तसेच त्यांनी त्याच्याकडून चार लाख रूपये ही घेतल्याची माहिती मिळाली, त्याचवरोबर घटनेच्या दिवसापासून गावातून तम्मा कुलाळ हा फरार झाला असल्याची माहिती मिळाल्याने पोलीसाची त्याच्यावरील संशय बळावला.

पोलीस त्याचा शोध घेत असताना तो कर्नाटकातील भागात लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलीसांच्या एका पथकाला तो पांडेझरी मोटेवाडी येथे लपून बसल्याची माहिती मिळाली. तेथे सापळा रचून पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला उमदी पोलीस स्टेशनमध्ये आणून त्याच्याकडे या घटनेची चौकशी केली असता त्याने घाबरत घाबरत आपणच इंदुबाई बिराजदार हिच्या डोक्यात लाकडी दांडक्याने उसणे दिलेल्या चार लाख रूपयाच्या मागणीवरून तिचा खून केल्याची माहिती दिली.

त्याने आपला गुन्हा कबुल केल्यावर पोलीसांनी या घटनेची लेखी फिर्याद मयत इटुंबाई याची मुलगी प्रतिक्षा बिराजदार हिच्याकडून घेतली. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार इंदुबाई पांडुरंग बिराजदार (वय ४२) हिच्या खून प्रकरणी तम्मा श्रीमंत कुलाळ (वय ४१) याच्या विरोधात उमदी पोलीस ठाण्यात भा.दं.वि. गु.रजि.नं १८४/२०२४ कलम १०३(१) नुसार गुन्हा दाखल केला. त्याला जत येथील न्यायालयात पोलीसांनी उभे केले असता न्यायालयाने त्याला १९ जुलै पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली.

पोलीस कोठडी दरम्यान पोलीसांनी त्याच्याकडून गुन्हयात वापरलेली लाकडी काठी जप्त केली. या घटनेचा तपास उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरी. संदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष माने, बहिदा मुजावर, आप्पासाहेब हाके, आगतराव मासाळ, मनिष कुमरे, सोमनाथ पोटभरे, दशरथ कोकाटे, आप्पासाहेब घोडके, सुदर्शन खोत यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button