माझ्या मुलाला फसवले जात आहे
बदलापूर प्रकरणात आरोपीच्या वडीलांचा दावा
बदलापूर अत्याचार प्रकरणात आरोपी अक्षय शिंदे याच्या वडिलांनी एक खळबळजनक दावा केला आहे. माझ्या मुलाला याप्रकरणात फसवले जात असल्याचा दावा केला. तसेच अक्षयची पुन्हा मेडिकल चाचणी करा, अशी मागणीही अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी केली आहे.
अक्षय शिंदे याने काहीही केले नसल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. अक्षयला फसवण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अक्षयचं काम बाथरूम सफाईचे आहे, तो बाथरुममध्ये कसा जाणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आमच्या घरातील सगळ्यांना मारहाण झाली आहे. पोलीस ठाण्यात गेल्यावर आम्हाला अक्षयनं काहीतरी केलं आहे, असे सांगण्यात आले. तसेच, अक्षयची पुन्हा मेडिकल चाचणी करा, अशी मागणीही अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी केली आहे.
आरोपीच्या घराची तोडफोड
आरोपी अक्षय शिंदे याच्या खरवई गावातील घराची गावकऱ्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे. अक्षयचे नातेवाईकही याच चाळीत राहतात. गावकऱ्यांनी त्यांनाही लक्ष केले. अक्षय शिंदे हा मुळचा कर्नाटक गुलबर्गा येथील असून तिथे राहणाऱ्या त्याच्या कुटुंबालाही अक्षयच्या कृत्याचा सामना करावा लागला. गावकऱ्यांनी त्याच्या घराची तोडफोड केली, भितीनं अक्षयचं कुटुंब तिथून पळून गेल्याची माहिती मिळत आहे.