क्राइम

विवाहित महिलेचा तीन प्रियकरांसोबत झोल, सिमकार्डमुळे झाली पतीच्या हत्येची पोलखोल!

विवाहित महिलेचे तिघांसोबत लफडे, सिमकार्डमुळे पतीच्या हत्येची झाली पोलखोलनवी दिल्ली : लग्नाला 12 वर्षे, नवऱ्याची साथ आणि वैवाहिक जीवनात एकामागून एक तीन प्रियकरांचा प्रवेश. पूजाचे म्हणणे होते की, तिचा नवरा तिला मारहाण करतो आणि त्याचे तिच्यावर प्रेम नाही. आणि म्हणूनच तिने प्रेमाच्या शोधात आपल्या घराच्या उंबरठ्याबाहेर पाऊल ठेवले. पतीला सोडून पूजा महाराष्ट्रात तिच्या पहिल्या प्रियकरसोबत दोन महिने राहिली. यानंतर तिला दुसरा प्रियकर मिळाला आणि पूजा आता त्याच्यासोबत स्वप्ने रंगवू लागली. काही दिवसांनी तिच्या आयुष्यात तिसरा प्रियकर आला. तीन प्रियकरांच्या प्रेमाने वेडी झालेल्या पूजाने शेवटी जे षडयंत्र रचले ते ऐकून तुमचाही थरकाप उडेल.

26 जुलै 2024 रोजी सकाळी सुमारे 6 वाजता यूपीच्या कानपूर जिल्ह्यातील मानकापूर भागात काही लोकांना रस्त्याच्या कडेला एक मृतदेह दिसला. मृतदेहावर एक दुचाकीही पडलेली दिसत होती. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. मृतदेह त्याच गावातील गुरुचरण नावाच्या व्यक्तीचा असल्याचे समोर आले. गुरुचरणला दारूचे व्यसन होते, त्यामुळे दारूच्या नशेत त्याचा अपघात झाला आणि त्यात त्याचा जीव गेला असावा, असा अंदाज सुरुवातीला व्यक्त करण्यात आला. शरीरावर कुठेही जखम झालेली नव्हती. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

शवविच्छेदनातून लागला सुगावा
दरम्यान, गुरुचरणचा मोठा भाऊ राजकुमार पोलीस स्टेशनला पोहोचला आणि त्याच्या भावाचा मृत्यू हा अपघात नसून त्याची हत्या झाल्याचा आरोप केला. हे ऐकून पोलीस अधिकारीही अवाक झाले. दुसऱ्या दिवशी पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यावर गुरुचरणच्या भावाच्या संशय खरा ठरला गुरुचरणचा गळा आवळून खून करण्यात आला होता. आता पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. राजकुमारने त्याच्या तक्रारीत गुरुचरणची पत्नी पूजा आणि इतर तीन गुलाब सिंग, शिवम आणि विष्णू यांची नावे आरोपी म्हणून नोंदवली.

पूजाकडे सापडले गुप्त सिमकार्ड
या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस आधी पूजा आणि उर्वरित तीन आरोपींचे कॉल डिटेल्स तपासतात. गुलाबसिंगच्या फोनवर रोज त्याच नंबरवर दीर्घकाळ संभाषण होत असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी या क्रमांकाचा तपशील तपासल्यावर अतिशय धक्कादायक माहिती समोर येते. हा नंबर गुरुचरणची पत्नी पूजाच्या नावावर होता. खरंतर पूजाने हा नंबर कोणालाही दिला नव्हता, ती या नंबरवरुन फक्त गुलाबसिंग याच्याशीच बोलायची.

शिवमसोबत राहिली दोन महिने
पोलिसांनी गुलाब सिंग आणि पूजा यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. पोलीस खाक्या दाखवताच गुरुचरणच्या हत्येची भयावह कहाणी समोर आली. पूजाने सांगितले की, 12 वर्षांपूर्वी तिचे गुरुचरणशी लग्न झाले होते. लग्नानंतर गुरुचरण दारू पिऊन तिला मारहाण करायचा. दरम्यान, पूजाची गावात राहणाऱ्या शिवमशी भेट झाली. हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढू लागली आणि एके दिवशी पूजा घर सोडून महाराष्ट्रात गेली. येथे दोघेही जवळपास २ महिने एकत्र राहिले आणि त्यानंतर पूजा गावी परतली.

शिवम नंतर विष्णू आणि नंतर गुलाब सिंग
गावात परतल्यानंतर काही दिवसांनी पूजाच्या आयुष्यात विष्णू नावाचा दुसरा माणूस येतो. त्यांच्या ओळखीचे रुपांतर हळूहळू अवैध संबंधात होते. आणखी काही महिने निघून जातात आणि पूजा तिचा चुलत दिर गुलाब सिंग याच्याशी लगट करते. आता पूजाला तीन प्रियकर होते. दरम्यान, पूजाच्या पतीला कुठूनतरी कळले की त्याच्या पत्नीचे गुलाब सिंगसोबत अफेअर आहे. गुलाबसिंग जेव्हाही त्यांच्या घरासमोरून जात असे तेव्हा गुरुचरण त्यांना शिवीगाळ करत असे. अशा स्थितीत पूजाने तिच्या तीन प्रियकरांसह पतीला मार्गातून दूर करण्याचा निर्णय घेतला.

12 दिवसांत खुनाचा कट रचून काढला पतीचा काटा
सर्वप्रथम पूजाने नवीन सिमकार्ड विकत घेतले आणि पतीपासून लपून या नंबरवरून गुलाब सिंग यांच्याशी बोलणे सुरू केले. तिने पतीला मारण्यासाठी गुलाबसिंगला तयार केले आणि इतर दोन प्रियकरांनाही या कटात सहभागी करुन घेतले. पूजाच्या पतीला शिवम आणि गुलाब सिंगसोबतच्या तिच्या नात्याबद्दल माहिती होती, पण विष्णूबद्दल माहिती नव्हती. चौघांनी मिळून 12 दिवसांत गुरुचरणचा खून करण्याचा कट आखला. 25 जुलैला सायंकाळी विष्णूने गुरुचरणला दारू पिण्याच्या बहाण्याने गावाबाहेर बोलावले आणि दोघेही शेतात बसून दारू पिऊ लागले.
गुरुचरण मद्यधुंद अवस्थेत असताना शिवम आणि गुलाबसिंगही तेथे पोहोचले. गुलाबला पाहताच गुरुचरणला राग आला आणि त्याने त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान, विष्णूने मागून गुरुचरणच्या गळ्यात टॉवेल टाकून गळा आवळला. गुरुचरणने जोर लावून सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केला असता गुलाबसिंग आणि शिवम यांनी मिळून त्याचा गमछाने गळा आवळला. त्यानंतर तिघांनी त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला आणि दुचाकी त्यावर टाकली व या हत्याकांडाला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. मात्र, कॉल डिटेल्सच्या माध्यमातून पूजाचा कट उघड झाला आणि पोलिसांनी या चौघांनाही गुरुचरणच्या हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button