हैदराबाद : प्रदर्शनाआधीच ब्लॉकबॅस्टर ठरलेला साउथ इंडियन चित्रपट पुष्पा-2 ची सध्या देशभरात चर्चा आहे. मात्र आता याच चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारा श्रीतेज हा अभिनेता आता अडचणीत सापडला आहे. त्याच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत.
अभिनेता अल्लू अर्जून आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘पुष्पा: द राइज’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात श्री तेज याने अल्लू अर्जुनच्या भावाची भूमिका साकारली आहे. त्याच्यावर लग्नाचे अमिष दाखवून आर्थिक, भावनिक तसेच शारीरिक शोषण केल्याचा आरोप करत एका महिलेने याबाबत हैदराबात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हैदराबादेतील कुकटपल्ली पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल करण्यात आलेल्या या तक्रारीत तिने म्हटले आहे की, श्रीतेजने मला फसवले आहे. त्यांने माझ्याशी लग्न करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याने माझे 20 लाख रुपये घेत आर्थिक शोषण केले. तसेच माझ्यासोबत रिलेशनमध्ये राहूनही त्याचे आणखी एका महिलेशी संबंध होते. या महिलेपासून श्रीतेजला सात वर्षांचे मूलही आहे, असा खळबळजनक आरोप या महिलेने केला आहे.
कुटुंबियांनी िदले होते आश्वासन
या महिलेने एप्रिल महिन्यात अशीच एक तक्रार दिली होती. मात्र श्रीतेजच्या कुटुंबीयांनी योग्य ते पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे ही तक्रार महिलेने वापस घेतली होती. माधापूर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. दाखल तक्रारीनंतर आथा पोलिसांनी आपला तपास चालू केला आहे.
या तक्रारीनुसार श्रीतेजवर वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बीएनएस 69, 115(2), आणि 318(2) यासह इतरही कलमांखाली श्रीतेजवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीतेज पहिल्यांदाच अशा प्रकारे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला नाही. याआधीही त्याच्यावर एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ व्हाईस प्रेसिडेंट सुरेश यांची पत्नी अर्चना यांच्यासोबत विवाहबाह्य संबंध ठेवल्याप्रकरणी चर्चेत आला होता.
श्रीतेज आहे साउथचा महत्त्वाचा अिभनेता
दरम्यान, श्रीतेजने आतापर्यंत पुष्पा, वंगावेती, धमाका, मगलावरम, बहिष्करण यासारख्या प्रसिद्ध तेलुगु चित्रपटांत भूमिका केलेली आहे. त्याचे तेलुगु चित्रपटसृष्टीत मोठे नाव आहे. मात्र अशा प्रकारे वादाच्या भोवऱ्यात सापडल्यामुळे त्याच्या प्रतिमेलाही काही प्रमाणात तडा गेलेला आहे.