महाराष्ट्रराजकारण

आदित्य ठाकरेची औकात काय, सत्ता आल्यास त्या प्रकरणाची चौकशी लावू : कदम

दापोली : दापोलीमधील सभेत आदित्य ठाकरेंनी थेट कोणाचाही उल्लेख न करता, इथेही एक गद्दार आहे. तो दादागिरी करतो, रडतो असं म्हणत अप्रत्यक्षपणे रामदास कदमांवर निशाणा साधला होता. आदित्य ठाकरेंची ही टीका रामदास कदमांच्या जिव्हारी लागल्याचं दिसत आहे. त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार आगपाखड केली आहे. आदित्य ठाकरे तुमची औकात आहे का? दिशा सालियन नावाची मुलगी होती, तिच्यावर बलात्कार झाला, तिला इमारतीवरुन ढकलून देण्यात आले. त्या प्रकरणात तुझं नाव होतं. तुला मी आज सांगतो, पुन्हा सत्ता आल्यावर या सगळ्या प्रकरणांची चौकशी नाही लावली तर मी माझं नाव रामदास कदम म्हणून लावणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

आदित्य ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत रामदास कदम म्हणाले की, तू रात्री 12 ला बाहेर पडतो, सकाळी 5 वाजता घरी येतो गुपचूप, याचे रात्रीचे धंदे महाराष्ट्राला कळू दे. अरे आपली औकाद बघून बोलायचे असते. शिवसेना पक्ष आम्ही वाढवलाय, केसेस अंगावर आम्ही घेतल्या, जेलमध्ये आम्ही गेलो. तुमचं पक्षासाठी योगदान काय? तुम्ही आयत्या बिळावर नागोबा बसलेत. कोणावर काय बोलताय, याचं भान ठेवा, असे रामदास कदम यांनी म्हटले. रामदास कदम यांच्या जहरी टीकेनंतर आता ठाकरे गटाचे नेते काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शिवसेनेतील बंडावेळी रामदास कदम आणि त्यांचे पुत्र योगेश कदम हे एकनाथ शिंदेंसोबत गेले होते. त्यामुळे या दोघांना धडा शिकवण्यासाठी ठाकरे गटाने दापोलीतील निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?
आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्या प्रचारासाठी दापोलीत सभा घेतली होती. यावेळी आदित्य ठाकरे यांनी रामदास कदम आणि उदय सामंत यांच्यावर आगपाखड केली होती. मी लहानपणापासून अनेकांना काका म्हणत होतो, पण त्यांनीच गद्दारी केली. तुम्हाला परत गुंडा फुंडांचे सरकार आणायचा आहे का? यांची गुंडगिरी एकाधिकारशाही संपवा. मी सभेसाठी मुद्दाम अशी काही ठिकाणे निवडली आहेत. मी फक्त तुम्हाला सांगतोय तुमच्यावर कोणी दादागिरी करत असेल कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर थांबा काळजी करू नका. आपलं सरकार येतंय त्यांना बर्फाच्या लादीवर झोपण्याची जबाबदारी ही माझी असेल असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला होता.

काय आहे दिशा सालियन प्रकरण
मुंबईतील टॅलेंट मॅनेजर दिशा सालियन हिचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. 8 जूनच्या मध्यरात्री मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या 14व्या मजल्यावरून 28 वर्षीय दिशा पडली होती.

या घटनेच्या दोन दिवसांनी म्हणजेच 11 जून रोजी दिशाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. शवविच्छेदन करण्यास दोन दिवसांचा विलंब का झाला? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. दिशाच्या मृत्यूबद्दल काही प्रश्न उपस्थित झाले होते.

दिशाच्या आत्महत्येच्या काही दिवसांनी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानेदेखील आत्महत्या केली होती. या दोन्ही आत्महत्या संशयास्पद असल्याचे सांगत तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने ठाकरे सरकारवर अनेक गंभीर आरोप केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button