Crime Story : पती बसवराज सांगून दमला, प्रेमसंबंध टाक तोडून; ऐकले नाही म्हणून संपवले भाग्यश्रीला डोके फोडून!
सोलापूर : शरीरसुखाची लालसा माणसाला विनाशाकडे घेऊन जाते. आपले घर-संसार व मुले-बाळे यांच्यातच रमलेली संयमी गृहीणी ही स्वतःसह इतरांनाही शिस्त लावणारी आणि धाकं दाखवणारी असते. तिचाच पाय घसरला तर मात्र सारे घर- दार रसातळाला गेल्याशिवाय रहात नाही. अलिकडे काळ बदलला, व्यक्तीस्वातंत्र्याला महत्त्व आले, मोबाईलमुळे अनेक गोष्टी सहज मिळू लागल्या. दुर्दैवाने बहुतेकांनी यातील वाईट गोष्टीच जास्त घेतल्या. सर्वश्रसाधारण महिलाही अनैतिक संबंधाच्या अमिषाला बळी पडू लागली. संसार सुखात चालला असतांनाही प्रियकराची गोडी वाटू लागलेल्या अनेक महिलांनी संसाराला सुरूंग लावून घेतला आहे. आयुष्याची वाताहत करून घेतली आहे, पण ही वाताहत बघण्याऐवजी क्षणिक कामतृप्ती पाहिली गेल्याने हे प्रमाण वाढत चालल्याचे भयावह दृष्य समाजात दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यातील विवाहिता आणि दोन मुलांची आई मोबाईल वापरू लागली. त्यातून तिचे चालचलन बदलले आणि संसारात वाद सुरू झाला. जीव लावणारा पती तिच्या जीवावर उठला. अनैतिक संबंधातून तिचा जीव गेला, तर तिचा पती व दीर गजाआड झाले.
आत्तापर्यंत बसवराज कोळी याच्या घरात सगळं काही सुरळीत चालू होतं. फार काही नसलं तरी बसवराज आणि त्याचे दोन भाऊ बऱ्यापैकी कमावत होते. घरची शेती होती ती बसवराजचे दोन भाऊ गजानन आणि शिवानंद सांभाळत होते. बसवराज स्वतः एका गॅरेजमध्ये काम करत होता. बसवराजचे आठ वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्याची पत्नी भाग्यश्री ही कर्नाटक राज्यातील. लोणीबीके, ता. इंडी, जि. विजापूर येथील गोविंद कोळी यांची मुलगी. आठ वर्षापूर्वी गोबिंद कोळी यांनी तिचा विवाह चांगली परिस्थिती आणि मुलगा पाहून बसवराज याच्याशी करून दिला होता. कालांतराने या दाम्प्त्याला एक मुलगा आणि मुलगी झाली.
सगळं काही आनंदात चाललं होतं आणि अचानक गोविंद कोळी यांना त्यांच्या जावयाचा फोन आला आणि सारं वातावरण बिघडून गेलं. इकडंही म्हणजे बसवराजच्या घरातलं वातावरणही गढूळ झालं होतं. त्याला कारण होती भाग्यश्री. आत्तापर्यंत आपल्या संसारात रमलेली भाग्यश्री आता मोबाईलवर रमू लागली होती. कोणाशी तरी तासन्तास ती गप्पा मारत बसलेली बसवराजला दिसू लागली. गप्पा मारण्यात ती इतकी दंग असायची की तिचे घरच्या कामाकडे लक्षच नसे. मुलांकडेही दुर्लक्ष करू लागल्यामुळे त्यांची आबाळ होवू लागली. इतकेच नव्हे तर आता ती काहीतरी कारण सांगून बाहेर जायची. तिला याबद्दल विचारले की ती भांडण करत असे, या साऱ्या प्रकारामुळे बसवराज कोळीच्या घरातील वातावरण गढूळ झाले होते. त्या कारणाने त्याने आपल्या सासरी फोन केला.
‘तुम्ही जरा भाग्यश्रीला समजावून सांगा…’ असे त्याने म्हणताच त्याच्या सासऱ्याने विचारले, ‘काय झालं जावईबापू… आत्तापर्यंत आमच्या भाग्यश्रीबद्दल तुमची काही तक्रार नव्हती… आणि आत्ताच असं अचानक काय घडलंय…’ असे सासऱ्यांनी विचारताच बसवराज कोळी याने घरात काय चाललंय, भाग्यश्री कशी वागते याबद्दल सविस्तर सांगितले, तेंव्हा बसवराजच्या सासऱ्यांनी जावयाची समजूत काढली. आम्ही तिला समजावून सांगतो असे म्हणत शांत रहाण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी भाग्यश्रीला समजावून सांगितले. भाग्यश्रीला तिच्या सासरच्या लोकांनीही समजावून सांगितले.
‘अगं, तुझं हे वय हाय का?असं वागायचं. दोन लेकरांची आई हायस तू… त्यांच्याकडे लक्ष दे… ती आता मोठी होत आहेत. तुझ्या वागण्याचा मुलांवर काय परिणाम होईल याचा विचार… त्यांच्याकडे लक्ष दे, चांगले शिक्षण दे’ असे सांगून त्यांनी भाग्यश्रीला समजावण्याचा प्रयत्न केला, पण भाग्यश्रीचे पाऊल वाकडे पडले होते. तिला आता ‘त्या’ची भुरळ पडल्याने तिने या बोलण्याकडे-समजावून सांगण्याकडे दुर्लक्ष केले.
आपण इतके भाग्यश्रीला समजावून सांगतो, तिला समजावून घेतो तरी ती ऐकत नसल्याने भाग्यश्री आणि बसवराजमध्ये भांडणे होवू लागली. दोन वर्षापासून हा प्रकार चालू होता. भाग्यश्रीचे बागणे हाताबाहेर चालले असल्याने बसवराज याने दि. २२ जून २०२४ रोजी भाग्यश्रीचा भाऊ चंद्रकांत (वय २६) याला बोलावून घेतले. चंद्रकांतही लगेच आला. बसवराजने सांगितले, ‘ही काही आमचं ऐकत नाही. आता तूच बघ. काय करायचं… ते…’
‘भावजी काय झालं हो… चंद्रकांत ‘अरे, तुझी बहीण नेहमी मोबाईलवर बोलत असते. घरात लक्ष देत नाही. अचानक उठून कुठेतरी निघून जाते. घरी नि आल्यावर तिला विचारलं की कुठं गेली होतीस, तर भांडण काढते. आता तूच काय करायचं ते बघ. तूच तिच्याकडून मोबाईल काढून घे, म्हणजे हे’ प्रकार थांबतील. या मोबाईलमुळं जग बिघडायला लागलंय…’
हे ऐकून चंद्रकांतने भाग्यश्रीकडे मोबाईल मागितला. सुरूवातीला तिने माझ्याकडे मोबाईलच नाही असे सांगितले, तेंव्हा चंद्रकांतने तिला समजावून सांगितले, तेंव्हा तिने कपाटात लपवून ठेवलेला मोबाईल त्याला काढून दिला. तो मोबाईल घेवून चंद्रकांत हा आपल्या गावी लोणीबीके येथे निघून गेला.
दुसऱ्या दिवशी दि. २३ जून २०२४ रोजी बसवराज याचा भाऊ शिवानंद याने चंद्रकांत (भाग्यश्रीचा भाऊ) याला फोन करून सांगितले की, ‘बसवराज तुमच्या घरी येणार आहे, तेंव्हा तू त्याला तू घेवून गेलेला मोबाईल परत दे.’ यावर चंद्रकांतने होकार दिला. थोड्याच वेळात बसवराज आपल्या सासरी आला. त्याला सासरच्या लोकांनी जेवण दिले. त्यानंतर बसवराजने चंद्रकांतकडील मोबाईल घेतला आणि तो तेलगाव येथे आला.
तिसरा दिवस उजाडला. दि. २४ जून २०२४ रोजी रात्री २ वाजता बसवराजचा भाऊ शिवानंद याने बसवराजच्या सासरी फोन केला आणि सांगितले की भाग्यश्री आणि बसवराजचे याचे भांडण झाले. रागाच्या भरात बसवराजने तिच्या डोक्यात दगड मारला आणि त्यात ती मरण पावली.
आपल्या बहीणीचा खून झाल्याचे समजताच चंद्रकांत शिवानंद याला म्हणाला की, ‘आम्ही सगळे तिकडे येतो, तोपर्यंत अंत्यविधी करू नका.’
यानंतर भाग्यश्रीच्या माहेरचे लोक निघाले आणि सकाळी ते तेलगाव येथे पोहोचले, तेंव्हा घरात भाग्यश्रीचा मृतदेह दिसून आला नाही. याबाबत विचारले असता बसवराजने सांगितले की, ‘आम्ही अंत्यविधी केला. आपल्या बहीणीचा खून करून तिचा अंत्यविधी केल्याचे ऐकताच चंद्रकांतला वाईट वाटले. त्याने भाग्यश्रीला जिथे मारले त्या खोलीत जावून पाहिले असता घरात बांगड्यांचे तुकडे पडलेले दिसत होते. तिचे अंथरूण मात्र दिसत नसल्याने चंद्रकांतने त्याबाबत विचारले असता ‘ते आम्ही जाळून टाकले’ असे उत्तर मिळाले.
इकडे बसवराजच्या घरात गोंधळ सुरू होता आणि तिकडे तेलगाव येथील भीमा नदीच्या काठावर एक मृतदेह जळत असल्याचे कामावर जाणाऱ्या शेतमजुरांना दिसून आले. गावात कोणाचा मृत्यू झाल्याची चर्चा नव्हती, मग कुणाचा मृतदेह जळतोय हे पाहून त्या शेतमजुरांना आश्चर्य वाटले. बा घटनेची माहिती काही जणांनी गावातील पोलीस पाटीलांना दिली. पोलीस पाटीलांनी मृतदेह जळत असलेल्या ठिकाणी पाहणी केली. मृतदेह कोणाचा होता हे त्यांना समजले नाही, यामुळे त्यांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात माहिती दिली.
मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, हेडकॉन्स्टेबल अविनाश पाटील, शहानूर मुलाणी, किरण चव्हाण लगेच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही जमलेल्या लोकांकडून माहिती घेतली, तेंव्हा एकाने गावातील एका घरात काहीतरी गोंधळ सुरू आहे याबाबत सांगितले. पोलिसांनी लगेच त्या घरात जाण्याचे ठरवले. ते घर बसवराज कोळी याचे असल्याचे समजले. पोलीस तेथे गेले असता घरात आलेल्या एका नातेवाईकाने सांगितले की, बसवराज याने आपल्या बायकोचा रात्रीच्या वेळी खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी नदीकाठी त्याने तिचा अंत्यविधीही केला आहे, तेंव्हा पोलिसांना समजले की, नदीकाठी जळणारा मृतदेह हा भाग्यश्री बसवराज कोळी हिचा आहे.
पोलीस घरात आल्याचे पहाताच भाग्यश्रीचा भाऊ चंद्रकांत गोविंद कोळी (वय २६) रा. लोणीबीके, ता. इंडी, जि. विजापूर (कर्नाटक) हा पुढे आला आणि त्याने पोलिसांना आत्तापर्यंत घडलेली सर्व माहिती सांगितली. त्यावरून पोलिसांना समजून आले की भाग्यश्री कोळी हिचा खून तिचा नवरा बसवराज याने तिच्या डोक्यात दगड घालून केला आहे आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे दोन भाऊ गजानन आणि शिवानंद यांनी मदत केली आहे.
पोलिसांनी त्या सर्वांना ताब्यात घेतले आणि भाग्यश्रीच्या खून प्रकरणी मंद्रूप पोलीस ठाण्यात बसवराज आडव्याप्पा कोळी (पती), गजानन आडव्याप्पा कोळी, शिवानंद आडव्याप्पा कोळी रा. सर्व जण तेलगाव, ता. द. सोलापूर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांनी तीनही आरोपींना अटक केली आणि त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायाधिशांनी त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
पोलीस कोठडीत पोलिसांनी तीनही आरोपींची कसून चौकशी केली, तेंव्हा बसवराज याने सांगितले की दहा वर्षापूर्वी माझा भाग्यश्रीसोबत विवाह झाला. सर्व काही सुरळीत असतांना दोन वर्षापासून भाग्यश्रीचे चालचलन बदलले. आधी ती घरातील सर्व कामे उरकून फावल्या वेळात टी.व्ही. मालिका पहात असे. खरे तर या मालिकेमध्ये दाखवले जाणारे सीन्स मला आवडत नसले तरी मी तिला काहीच बोललो नाही. आम्हाला दोन अपत्ये झाली. आता आमची दोघांचीही जबाबदारी वाढली होती. मी जादा काम करून मुलांसाठी पैसा साठवत होतो. घरात सर्व कामे उरकून मुलांकडे २४ लक्ष देणाऱ्या भाग्यश्रीमध्ये मात्र दोन वर्षापासून बदल जाणवू लागला. पूर्वीप्रमाणे ती मला शरीरसुखही देईनाशी झाली. घरात चीडचीड करून भांडणे करू लागली. गुपचूप मोबाईलवर पाहून बोलत होती. याकडे काही दिवस आणि दुर्लक्ष केले, मात्र गावामध्ये मोठा तिचे कोणा एका व्यक्तीबरोबर प्रेमप्रकरण असल्याची चर्चा होवू लागली, तेंव्हा मात्र बसवराजने तिच्यावर लक्ष ठेवण्यास सुरूवात केली.
ती दोन-तीन दिवसांतून एकदा घराबाहेर कोठेतरी जायची. बाहेर कोठे कबुली दिली. गेली होतीस? असे विचारताच ती भांडण करत असे. घरात वाद नको म्हणून बसवराज गप्प रहात असे. तिला ‘तुझं जे काही चाललं आहे आणि गावात चर्चा सुरू आहे ते प्रेमप्रकरण बंद कर’ असे सांगितले, पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलें. अखेरीस तिच्या माहेरी ही बाब सांगितली. त्यांनीही तिला समजावून सांगितले, तरीही ती गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेले प्रेमप्रकरण बंद करत नव्हती. दि. जून २०२४ रोजी, ‘तुला मोबाईल कोणी घेवून दिला? कोणाला भेटायला जातेस ?’ विचारले, तिने काहीही सांगता भांडण करायला सुरूवात केली. तिचे हे वागणे बसवराजचा संयम सुटला त्याने तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून . पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह भीमा नदीकाठी नेवून त्यावर अंत्यसंस्कारही केला. यासाठी त्याला त्याच्या दोन भावांनी मदत केली. अशा तन्हेने बसवराजने खून केल्याची कबुली दिली.
या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर याच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, हेडकॉन्स्टेबल अविनाश पाटील, किरण चव्हाण, शहानूर मुलाणी यांनी केला.