विवाहबाह्य संबंधाची किनार, पत्नीसह सासरच्या जाचाला कंटाळुन कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर : पत्नी व सासरा, सासु यांच्या सततच्या कौटंबिक कलाहाला कंटाळुन एका ३६ वर्षीय व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केली. बुधवारी ७ ऑगस्टला पहाटे ४ च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. अशोक दत्तु दळवे (३६, रा. शिवनेरी कॉलनी सिडको, मुळ रा. केज जि. बीड) असे गळफास घेत आत्महत्या करणार्याचे नाव आहे. याप्रकरणी अशोक यांच्या वडीलांच्या तक्रारीवरून पत्नी सासु,सासरा, मेव्हना यांच्याविरूध्द सिडको पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुजा अशोक दळवे, हनुमंत साळुंके, सुरेखा साळुंके, अभिजीत साळुंके असे आरोपींचे नावे आहेत.
अशोक हे बजाज कंपनीत कामगार म्हणुन काम करत होते. त्यांचा विवाह २०११ मध्ये पुजा हिच्यासोबत झाला होता. लग्न झाल्यापासूनच पुजा व अशोक यांचे वाद होत होते. कुटुंबातील वडीलधार्यांनी त्यांची समजुत काढुन त्यांना संसार करण्यास सांगितले होते. त्या दोघांना एक मुलगा व एक मुलगी आहे. २०२२ मध्ये अशोकच्या वडीलांना अशोकने फोन करून पुजाचे बाहेर प्रेमसंबध सुरू असल्याचे सांगितले. हा प्रकार पुजाच्या वडील व सासु यांना सांगितला तर त्यांनी अशोकला मारहाण केली. दरम्यान, सोमवारी रात्री ८ वाजता पुजा दळवी हिने सासरा दत्तू किसन दळवे यांना कॉल करून सांगितले की, अशोकसोबत भांडण झाले आहे. मी आता माहेरी जात आहे जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत मी नांदायला येणार नाही असे सांगितले. त्यामुळे दत्तू दळवे यांनी घाईघाईने छत्रपती संभाजीनगर येथे धाव घेतली.
नांदायला येण्यासाठी जमीन पुजाच्या नावावर करण्याची अट घातली. मंगळवारी रात्री ९ वाजता अयोध्यानगरात अशोक व आई-वडील हे पुजाला घेण्यासाठी गेले होते. तेथे बर्याच वेळा चर्चा झाली. मात्र, तिने नांदायला येण्यास नकार दिला. त्यामुळे रात्री साडेबारा वाजता परत आले. अशोक व आई-वडील घरी आल्यानंतर झोपी गेले होते. पहाटे चार वाजता अशोक दळवे यांची आई शालबाई दळवे यांना जाग आली. तेव्हा मुलगा अशोक जागेवर नव्हता. त्यांनी त्याचा शोध घेतला असता त्याने किचनरुममध्ये हुकाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे समोर आले. त्याला फासावरून खाली उतरवित घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. या गळफास प्रकरणी दत्तू किसन दळवे यांच्या तक्रारीवरून अशोकची पत्नी पुजा अशोक दळवे, सासरा हनुमंत साळुंके, सासू सुरेखा साळुंके, मेहुणा अभिजीत साळुंके यांच्या विरुद्ध आत्महात्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.